भगवान बुद्ध आणि त्यांचा या ग्रंथाची सांगता समारोप आणि वर्षावास समाप्ती

🔹निमित्ताने भोजनदानाचा कार्यक्रमाला रमामाता महिला मंडळ आणि शांतिदुत समितीचा पुढाकार

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.20ऑक्टोबर):-तथागत भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व अभिवादन करून सुरू करण्यात आला.भगवान बुद्ध आणि त्यांचा या ग्रंथ, अश्विनी पौर्णिमेच्या निमित्ताने पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भदंत कीर्ती बोधी आणि उपस्थित सर्वच महिलांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे म्हणून मा.सुभाषराव दिवेकर (माजी डी.वाय.एस.पी. मुंबई), मा.गोपालजी अग्रवाल (संचालक पुसद अर्बन बँक उमरखेड), मा.नितीनजी भुतडा (जिल्हा अध्यक्ष भाजप), मा. प्रकाश दुधेवार सर (नगरसेवक उमरखेड), मा.भैय्या पवार, मा.वानखडे साहेब (इंजिनिअरिंग),विरेंद्र खंदारे (सामाजिक कार्यकर्ते) इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजक कुमार केंद्रेकर साहेब (अध्यक्ष शांतिदुत समिती तथा भीटासे तालुका संपर्क प्रमुख उमरखेड) आणि रमामाता महिला मंडळ च्या महिलांनी केला होता.

तर दुपारी तीन वाजता वर्षावास समाप्ती समारोप निमित्ताने भोजनदानाचा कार्यक्रम आयोजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्डातील 400 ते 500 लोकांना या स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घेतला.

अशाप्रकारे भगवान बुद्ध आणि त्यांचा या ग्रंथाची सांगता करून वर्षावास समाप्तीच्या निमित्ताने भोजनदानाचा कार्यक्रमाला रमामाता महिला मंडळ आणि शांतिदुत समितीने पुढाकार घेऊन साजरा करण्यात आला.

यावेळी हिराबाई दिवेकर, शांताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, जाणकाबाई इंगोले, यशोदाबाई दिवेकर, ज्योतीताई इंगोले, उषाताई इंगोले, आनंदाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, यशोधरा धबाले, भारताताई केंद्रेकर,शंकरराव दिवेकर,दिगंबर श्रवले, मारोतीराव दिवेकर,भीमराव गवंदे, दिलीप मुनेश्वर,भीमराव श्रवले,दीपक इंगोले, तुषार पाईकराव, अजय दिवेकर, बुद्धभूषण इंगोले, तरुण मंडळी व अनके बालक बालिका उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ दिवेकर (भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया यवतमाळ ) तर आभार प्रफुल दिवेकर यांनी मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED