निराधारांचे रखडलेले मानधन दिवाळीपूर्वी जमा करा अन्यथा प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन करणार – रघुनाथ तोंडे

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.21ऑक्टोबर):-संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना गत पाच सहा महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाल्यांमुळे त्यांच्यावर ऐन सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ आली.

असल्यामुळे प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील हजारो निराधाराचे व जेष्ठ नागरिकांचे रखडलेले मानधन दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अन्यथा बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हात आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या पत्रकात म्हटले जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे संतोष आघाव रमेश चव्हाण आशोक सोनवणे नंदकुमार झाडे बालाजी घोळवे विठ्ठल मुंडे विष्णू मुंडे महादेव कांगणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रहार सैनिकांनी केले आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED