आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करून दिवाळी गोड करावी- दत्ता वाकसे

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.21ऑक्टोबर):-गेल्या दोन महिन्यापूर्वी, बीड जिल्ह्यामध्ये, खूप मोठ्या, प्रमाणात शेतकऱ्यांना अतिदृष्टीचा, सामना करावा लागला होता त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतामध्ये, लाखो रुपये खर्च करून जोमाने पीक, आणली होती परंतु, मध्येच खूप, मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या, अवकृपेमुळे, आणि झालेल्या मुसळधार, अतिवृष्टीमुळे, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे वायाला गेले, आणि इकडे खूप मोठा गाजावाजा करत आम्ही शेतकरी पुत्र आहोत, म्हणत मताचा जोगवा मागणारे, आघाडी सरकार शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई देऊ, म्हणून नुसत्या, वृत्तपत्रातून बातम्या, प्रकाशित होत आहेत परंतु शेतकऱ्यांची,दिवाळी मात्र गोड होणार की नाही, हाच सर्वात मोठा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे, त्यामुळे नुकसानभरपाईचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या, खात्यामध्ये वर्ग करून शेतकऱ्यांना, आगामी होणारी दिवाळी, गोड करावी अशी मागणी करत, धनगर समाज संघर्ष समितीचे बीड, जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी, प्रसिद्धीस पत्रक, दिले आहे पुढे ते म्हणाले.

की महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकारकडून, नुसत्या पोकळ, आश्वासनाच्या गप्पा, मारल्या जात, आहेत परंतु इकडे, मात्र शेतकरी, अतिशय खूप मोठ्या, प्रमाणात होरपळला, गेलेला आहे आणि सरकारने, काही दिवसांपूर्वी, तुटपुंजी मदत जाहीर केलेले, आहे परंतु ती मदत मात्र शेतकऱ्यांना, अद्याप मिळाले नाही, शेतकऱ्यांना ती मदत, मिळणे गरजेचे आहे, परंतु मिळाली नसल्याने शेतकरी, निरास झालेला आहे, आज परिस्थिती पाहिली तर शेतकरी हा, अतिशय हवालदिल ,झालेला आहे त्यामुळे, तात्काळ नुकसानग्रस्त, शेतकऱ्यांना, अतिदृष्टीची, नुकसानभरपाई खात्यामध्ये, वर्ग करून शेतकऱ्यांची, दिवाळी गोड, करावी असे देखील, दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात वाकसे यांनी म्हटले

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED