भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खाते तात्काळ उघडा नसता बॅकेंसमोर आंदोलन करणार – कैलास दरेकर यांची मागणी

26

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.21ऑक्टोबर):-भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खाते तात्काळ उघडा,मृद्रा योजनेचा लाभ किती लाभार्थी यांना दिला,जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकरणे किती मंजूर केले,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ किती लाभार्थी यांना दिला अशा अनेक योजनेना भारतीय स्टेट बँक कर्ज मंजूर करत असते अशा अनेक योजनांना बॅंकेने दिलेल्या प्रकरणाची माहिती जनतेसाठी खुली करण्यात यावी तसेच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांचे खाते होल्ड केलेले आहेत.

ते खाते तात्काळ न उघडल्यास मनसे भारतीय स्टेट बँकेच्या समोर आंदोलन करेल असे मनसेच्या कैलास दरेकर यांनी तहसीलदार आष्टी व स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी मनसेचे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर,ता.अध्यक्ष सोपान मोरे,ता.अध्यक्ष बाबासाहे दिंडे,संपत सायकड,राजू खेडकर,सुरज गिते,लहू भवर,महेश अनारसे,पराग बेदरे,रवि माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.