गावपातळीवर सेवा देणारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

26

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

नांदगाव खंडेश्वर(दि.22ऑक्टोबर):-येथिल पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे *नव* महिन्याचे मानधान न झाल्याने दिवाळी अंधारात असल्याने त्यांच्या परिवाराचे काय असे मोठे संकट आज ग्रामपंचायत कर्मचारी यांचे समोर उभे आहे.तेव्हाअहोरात्र गावपातळीवर सेवा देणारे कर्मचारी यांचे कडे लोकप्रतिनीधी सह शासनाचे दुर्लक्ष होत आहे .एकी कडे परतिच्या पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबिन व दिवाळी अगोदर येणारे कपाशीचे पिक हे सुद्धा मातीमोल झाले आहे.

त्यात ग्रामपंचायत कर्मचारी यांना घरटॅक्स वसुली करण्याचा निगडीत अधिकाऱ्यांचा तगादा असतो तेव्हा ते प्रत्येक नागरीकांच्या घरी जावुण वसुली करीता ये जा करतो परंतु काही शेतकरी हे आपल्या परिस्थिती नुसार सोयाबिन वर आपलं घर टॅक्स भरतो तर काही मंजुरीच्या पैशातुन भरावे लागतो असे असताना शेतकऱ्याचीच दिवाळी सुद्धा अंधारात असल्याने वसुली होण्यास वेळ लागु शकतो तेव्हा ग्रामपंचायत सचिव तसेच शासनाने आमची दिवाळी अगोदर 9.महिन्यापासुन मानधान न झाल्याने आम्हाला तातडीने मानधान देण्यात यावे जेणेकरुन अधिकारी व लोकप्रतिनी सारखे आमचे जिवन जगणे सुकर होईल असे मत येनस येथिल ग्राम पंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर धनधरे.तसेच मंगेश घरफाळ व इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रसिध्दापत्राव्दारे आपले मत व्यक्त केले.