सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक न्याय

जगात सर्व देशात लाखो लोक सार्वजनिक सेवेचा लाभ घेतात.रिक्षा, टॅक्सी,बेस्ट बस,लोकल रेल्वे आणि विमान यातुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवित हानी होणार नाही यासाठी सरकार या सर्व वाहनांना सुरक्षा नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागते. प्रवाशी वाहनात बसण्या अगोदर चालकाला त्यांच्या वाहनांची सर्व बाजूने तपासणी करावी लागते. टायर मधील हवा,पेट्रोल,डिझेल टाकीतील क्षमता,इंजिन चालु करून त्यांचे ऑइल,पाणी पंख्याचा वेग,बेल्टची स्थिती ह्या सर्व बरोबर असतील तर त्या वाहनाचा रोडवर,रेल्वे ट्रकवर,रनवे वर पुढचा प्रवास सुरू करता येते. त्यासाठी परवाना दिला असतो. ह्या सर्व नियमांचे पालन केले आणि अपघात झाला तर विमा कंपन्या तुम्हाला नुकसान भरपाई देतात.या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना काय शिक्षा होतात.याची काही उदाहरण आज डोळ्यासमोर आहेत.सामाजिक बांधिलकी ठेऊन सामाजिक न्याय दिला जातो काय?.

एकाच वेळी अनेक ठिकाणावरून अनेक लोक वेगवेगळ्या वाहनाने प्रवास करीत असतात. अपघात झाल्यावर त्या प्रवाशांची,वाहनांची आणि चालकांची चौकशी केली जाते. पण त्यामुळे झालेले नुकसान जीवित हानी भरून निघत नाही. म्हणूनच सुरक्षा नियमांचे पालन करून प्रत्येक नागरिकांनी वागले पाहिजे.तरच सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक न्याय सर्वाना मिळेल.माणसाचा जीव खुप महत्वाचा असतो.सुखदुःखात माणसचं माणसाच्या आयुष्यात कामा येतात. तुम्हाला पैशांची गरज भासली तर ते व्याजाने ही मिळतात पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजुन तरी सुरु झालेली नाही. म्हणून नाती जपा आनंदात काय परके सुद्धा सामील होतात पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात तेच खरे आपले नातलग, मित्र आणि हितचिंतक असतात.निसर्गाच्या नियमांचे पालन करा. संकट कधी येत नाही. अपघात होत नाही. कारण वेळोवेळी आपण निसर्गाच्या सानिध्यात राहुन उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतूचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला असतो.प्रत्येक ऋतूत आपण त्यांची नोंद घेऊन योग्य ती दक्षता घेतो की नाही. तशीच सामाजिक बांधिलकी कायमस्वरूपी आपल्या जवळ असली पाहिजे तरच ती प्रत्येक वेळी इतरांना देऊ शकतो.

प्रत्येक वेळी शासकीय मदत मिळालीच पाहिजे ही अपेक्षा आपण ठेवतो.ती चुकीचे आहे.म्हणूनच समाजातील माणसात सतत राहिले पाहिजे. जे उच्चशिक्षित उच्चपदस्थ माणसं असतात ते समाजात वावरतांना दिसत नाही. तेच लोक कोणतेही काम सरकारी खात्याने केले पाहिजे अशी अपेक्षा करतात.त्यांच्याचकडे सामाजिक बांधिलकी नसते. म्हणूनच ते निर्दयीपणे वागतात.असंघटीत कष्टकरी कामगार मजूर कोणत्याही सामाजिक कामात सामाजिक बांधिलकी म्हणूनच परिणामाची पर्वा न करता सहभागी होतांना दिसतात.उच्चशिक्षित उच्चपदस्थ दिसतात का?. असंघटित कष्टकरी कामगार मजूरांनी उच्चशिक्षित उच्चपदस्थ सारखे कुणासाठीही वेळ नसेल इतकं “व्यस्त” होऊ नये आणि कुणीही गृहीत धरावं, इतकं “स्वस्त” पण होऊ नये.

संघटित कामगारांना न्याय हक्क व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांच्या संघटना स्थापन झाल्या.त्या त्यांच्या समोर असंघटित कामगारांचे ठेकेदार आर्थिक,शारीरिक,मानसीक शोषण करतात. त्यांची अधिकृतपणे नोंदणी होत नाही. त्यामुळेच तो शासकीय कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ही परिस्थिती सर्व क्षेत्रातील संघटित कामगारांना त्यांच्या संघटनांना आणि शासकीय पातळीवरील अधिकारी वर्गांना दिसत नाही काय?.कामावर असतांना सामाजिक बांधिलकी दाखविली तर शासकीय कामावर प्रत्येक असंघटीत कष्टकरी कामगार मजुरांची अधिकृतरीत्या नांव नोंदणी होऊन शासनच्या सामाजिक कल्याणकारी योजनाचा लाभ सर्वाना भेटू शकते.सामाजिक बांधिलकी असली तर सामाजिक न्याय मिळू शकतो.
आज सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या संघटित कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात सामाजिक बांधिलकी शिल्लक राहिली नाही असे शंभर टक्के सत्य दिसते आहे. म्हणूनच असंघटित कष्टकरी कामगार,मजूर शेतमजूर यांच्या कंत्राटी कामगार फौजा निर्माण होतांना दिसत आहेत.त्यांचे शैक्षणिक,आरोग्य,आणि रोजगारांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात शोषण होतांना दिसत आहे. माणसांनी माणसाचे शोषण करणारी समाज व्यवस्था बदलली पाहिजे. माणसांनी माणसाला सामाजिक बांधिलकी दाखवून आणि सामाजीक न्याय मिळवून देण्याचे काम केले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जमेल एवढं नक्की द्या पण सेवानिवृत्ती व मारण्याच्या आधीच ते वाटायला शिका तरच लोक नंतर नाव काढतील. कमीत कमी आठवण तरी ठेवतील.

इतिहास सांगतो काल सुख होतं. विज्ञान सांगतं उद्या सुख असेल. पण सामाजिक बांधिलकी ठेवणारे माणस सांगतात. मन खरं असेल आणि ह्रदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे. सामाजिक बांधिलकी ठेऊन प्रत्येक असंघटीत कष्टकरी माणसांना शासकीय सामाजिक न्याय तेवढा मिळवून द्या.
सामाजिक बांधिलकी नसणाऱ्या माणसांकडे क्रांतिकारी विचारांचा भक्कम पाया नाही.त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच उभीच राहू शकत नाही. काही गैरमार्गाने उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं कोणी ठामपणे सांगु शकत नाही. त्यांच्या जीवनात सुखाचे,दुःखाचे अनेक प्रकारचे प्रसंग येतात.त्यात ते मुळासकट कोसळून जातात.पण सामाजिक बांधिलकी असणाऱ्या क्रांतिकारी विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगातून ठामपणे उभी राहतात. शासकीय मदत मिळावी यासाठी ते संघर्ष करीत नाही. तर आपल्या भौतिक गरजा मर्यादित ठेऊन ध्येयपूर्तीसाठी संघर्ष करत धडपडत राहतात.नियमितपणे संघर्ष करून धडपडूनही अपयश पदरी पडते म्हणू संघर्ष व धडपडने सोडत नाही. जे मिळते ते आनंदाने स्वीकारून उरलेल्यासाठी संघर्षाची मशाल कायम प्रजवलीत ठेवावी.ती विझता कामा नये.आयुष्यात कुटुंबीक,नातेवाईकां कडून कामाच्या ठिकाणी, आणि समाजातील असंतोषी लोकांकडून संकट नियमितपणे येतात,आणली जातात.ती शक्यतो टाळण्यासाठी प्रयत्नशील राहावे.त्यांचे दुःख करीत बसता कामा नये. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलला म्हणजे घटनाच बदललेल तीच खरी ताकद विचारात असते. माणसाकडे पाहतांना सामाजिक बांधिलकी माणुसकीच्या समतावादी विचाराने पाहिले तर सामाजिक बांधिलकी असणारी माणुसकी बाहेर पडेल. आणि सामाजिक न्याय मिळेल.शासकीय अधिकारी म्हणून विषमतावादी विचारांच्या समाज व्यवस्थेचे अलिखित नियम डोळ्यासमोर ठेऊन पाहिले तर सामाजिक बांधिलकी आणि शासकीय सामाजिक न्याय नाकारल्या जाईल.

देशात सार्वजनिक उद्योग धंद्याचे खासगीकरण केल्यामुळे लाखो कामगारांची कायमस्वरूपी नोकरी गेली. जिथे २४/७ आणि ३६५ दिवस काम चालते तिथे कंत्राटी कामगार कायमस्वरूपी काम करीत असतील तर त्यांचे किती प्रकारचे शोषण होत असेल.विचार करा. हे तपासण्यासाठी सामाजिक बांधिलकी असणारे समतावादी विचारांची गरज आहे. आजच्या घडीला देशात विषमतावादी विचारांच्या प्रशासकीय यंत्रणे मार्फत जे सांगितले जाते तेच आपणास स्विकारावे लागत आहे. त्यात सामाजिक बांधिलकी नांवाची माणुसकी राहली नाही,तर क्रूरपणा दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे.हे सर्वच भारतीय नागरिकासाठी हानीकारक आहे.म्हणनूच सामाजिक बांधिलकी ठेऊन सामाजिक न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे(भांडुप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९

नागपूर, महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED