दाई जंगो रायताड गोंडीयन पेनठाना (वडाळा पैकू) चिमूर येथे “शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके” शहीद दिन संपन्न

24

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.22ऑक्टोबर):-चिमूर – शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचा १६४ वा शहीद दिन “दाई जंगो रायताड गोंडीयन पेनठाना” येथे आयोजीत करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल मसराम होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजु मडावी, विलास कोयचाडे, भारत कोडापे उपस्थित होते.

अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यानी शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचे जिवनावर माहीती सांगीतली. वीर बापुराव शेडमाके केवढ एका समाजासाठी फासावर गेले नाही तर इंग्रजांच्या गुलाम गिरीतुन मातृभूमीला मुक्त करण्यासाठी वयाच्याअवघ्या पंचेवीस वर्षात देशासाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यानी केलेल्या कार्याची पुढील पिढीला आठलन राहावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन थोर पुरुषांच्या जयंती- पुण्यतिथी साजरी करणे आवश्यक आहे,असे विचार सांगीतले.

महीला प्रतीनिधिमधुन मनिषा सुनिल मसराम यांनी महीलानी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेऊया असे विचार सांगीतले. कार्यक्रमाला सुनिल मसराम, विलास कोयचाडे, डॉ राजु मडावी, भारत कोडापे, देवदास धुर्वे, मारोती मसराम , देवानंद मेश्राम, पुरुषोत्तम कुमरे, जिवन येरमे, गणेश मडावी, प्रकाश कोडापे, प्रित कोडापे, निता धुर्वे, मनिषा मसराम, सपना मडावी, अलका मडावी, ललिता मडावी, आशाखुशाल मडावी, बेबी प्रकाश कोडापे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोडापे यांनी केले व आभार प्रदर्शन देवदास धुर्वे यांनी केले कार्यक्रमासाठी समाजबांधवांनी सहकार्य केले