नासिक पेठरोड कुमावत नगर येथे सिलिंडरच्या स्फोटात एकच घरातील सहा व्यक्ती गंभीर जखमी

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.22ऑक्टोबर):- पेठ रोड कुमावत नगर येथे सकाळी झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात एकाच घरातील सहा व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे या सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे सर्व परराज्यातील असून मोलमजुरी निमित्त दहा ते पंधरा वर्षापासून नाशिकमध्ये स्थायिक आहे सकाळी सात वाजता ही घटना घडली गॅस गळती झाल्यामुळे हा गॅसचा भडका झाला असल्याचे बोलले जात आहे.

माचीस ने बिडी पेटवताना गॅसचा भडका झाला त्या खोलीतील लवलेश धरम पाल राहणार आलादात पूर जिल्हा उत्तर प्रदेश अखिलेश धरमपाल विजयपाल राहणार फत्तेपूर जिल्हा उत्तर प्रदेश संजय मौर्य राहणार आला दत्तपुर उत्तर प्रदेश अरविंद पाल राहणार इसापूर फत्तेपूर उत्तर प्रदेश विरेन्द्र कुमार राहणार बालापुर उत्तर प्रदेश सर्वांचे वय 30 ते 35 वर्षाची असून सर्व जखमी झाले आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED