मातोश्री क्लिकनीक सोजन्य आनंदऋषी नेत्रालय शिबिराचा लाभ घ्यावा = डॉ राम धुमक

28

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख )

गेवराई(दि.22ऑक्टोबर):-तालुक्यातील तलवाडा येथील प्रसिद्ध मातोश्री क्लिकनीकचे डॉ राम धुमक यांच्या माध्यमातून अनेक वेळा विविध आजारांवर तलवाडा पारिसरातील रूग्णांसाठी शिबिराच्या माध्यमातून मदत करण्याचे काम डॉ राम धुमक हे दोन वर्षापासून करत आहेत. दोन वर्षापासुन कोरोणाच्या समस्यांमुळे शिबीर घेणे बंद करण्यात आले होते. तलवाडा परिसरातील प्रसिध्द डॉ राम धुमक मातोश्री क्लिकनीक व अहमदनगर येथील सुप्रसिद्ध आनंदऋषी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचा आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि.२६/१०/२०२१ मंगळवारी सकाळी १०:०० ते २:०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू फेको लेसर शस्त्रक्रिया शिबीर सोय सर्व गरजु व्यक्तींसाठी अल्पदरात शस्त्रक्रिया प्रवास जेवण व २ दिवस राहण्याची शिबीरामध्ये येताना आधार कार्ड, रेसनकार्ड झेरॉक्स फोन नंबर आणावे चालु असलेले ओषीध/ गोळ्या व डॉक्टरांचे रिपोर्ट सोबत आणावे असे आवाहन करण्यात आले आहे. ठिकाण मातोश्री क्लिकनीक माने काॅम्लेक्सच्या पाठिमागे बाजार रोड तलवाडा असे आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क आनंदऋषी नेत्रालय जनसंपर्क अधिकारी प्रसाद गर्जे ९९७००२०२७० यांना संपर्क साधावा असे आवाहन तलवाडा मातोश्री क्लिकनीचे डॉ राम धुमक यांनी केले आहे.