मांडवा शिवारात बकरीची लांडग्याने केली शिकार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.22ऑक्टोबर):-तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय शेंबाळपिंपरी हद्दीत येणाऱ्या मांडवा शिवारात बकरीची लांडग्याने केली शिकार…

प्राप्त माहिती अशी की मौजे मांडवा येथील मोलमजुरी करणारे प्रविण कांबळे हे २० ऑक्टोंबर२०२१ रोजी दुसऱ्याच्या शेतात कामाला आपली पाळीव बकरी घेऊन गेले व बकरीला शेतातील धुर्‍यावर चारण्याकरिता सोडून दिले व ते शेतातील कामात व्यस्त झाले.

या वेळेत त्यांच्या बकरीवर लांडगा या वन्य प्राण्याने हल्ला केला व तेव्हढ्यात शेतात काम करणाऱ्यानी आरडाओरडा केल्याने लांडग्याना बकरी खात असताना हाणण्यात आले व लांडग्याच्या तावडीतून बकरीला सोडवण्यात आले .परंतु बकरी मृतावस्थेत अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आली.

यामुळे मोलमजुरी करून खाणाऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याने वनविभाग वनपरिक्षेत्र कार्यालय शेंबाळपिंपरीकडे यांनी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी नुकसान झालेल्यानी केली आहे.

महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED