मोर्शी येथे “घरगुती गॅस, इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन” !

31

🔸राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात मोदी सरकारचा जाहीर निषेध !

✒️मोर्शी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मोर्शी(दि.22ऑक्टोबर):-देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या विरोधात मोर्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज दि. 22 ऑक्टों रोजी स्थानिक जयस्तंभ चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वारे मोदी तेरा खेल स्वस्ती दारु मेहेंगा तेल अशी नारेबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे अबकी बार महेंगाई पर वार करण्यासाठी मोर्शी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोर्शी तालुका तर्फे घरगुती गॅस, इंधन वाढ विरोधात आंदोलन तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

आधीच कोरोनामुळे डबघाईस आलेले व्यवसाय आणि त्यात दिवसेंदिवस वाढणारी महागाई यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून त्यातल्यात्यात कधी अवकाळी पाऊस तर कधी वादळ वारा अतिवृष्टी पिकावर पडलेल्या अनेक घातक रोगांचा सामना करण्यासाठी महागड्या फवारण्या, शेती मशागत मजुरी बी-बियाणे खर्च, निंदन इतर मशागत करत करत जेमतेम हाती आलेली पिके घेऊन बाजारपेठ गेल्यानंतर शेतीमालाला योग्य भाव नाही. शासकीय खरेदी बंद व आता यावर्षी पुन्हा लॉकडाउनचा फटका बसल्याने हातात पैसा नसतांना शेतकरी उधार उसनवार करत पुढच्या वेळी शेतात चांगले पिक घेऊ हे स्वप्न उराशी बाळगून असतानांच केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 500 ते 700 रुपये दरवाढ केली. तसेच पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या दरवाढ ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

केंद्र सरकार कडून पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना याचा आर्थिक फटका बसत आहे. उज्वला गॅसचे आमिष दाखवून गॅसची सबसिडी बंद केली पेट्रोल डिझेलचे भाव शंभरी पार केल्याने महागाई गगनाला भिडली. शेतीमालाला मातीमोल भाव मिळत आहे. रासायनिक खते बियाणे पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले आहे. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. ही होणारी दरवाढ महागाई तात्काळ थांबविण्यात यावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्थानिक गांधी पुतळ्याजवळून गॅस सिलेंडरची प्रेत यात्रा काढून त्यामागे बैलबंडी घेऊन कार्यकर्ते जयस्तंभ चौक येथे पोहचले व त्यांनी या ठिकाणी केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करून वारे मोदी तेरा खेल स्वस्ती दारु मेहेंगा तेल असे नारे लावून गॅस सिलेंडरच्या तिरडीसह हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. व एक लेखी निवेदन तहसीलदार श्रीकृष्ण ठाकरे यांना देण्यात आले.

राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष प्रा डॉ सुशील गावंडे, जिल्हा उपाध्यक्ष विपीन शिंगणे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रुपेश वाळके, युवक तालुका अध्यक्ष हितेश साबळे, उपाध्यक्ष अनिकेत राऊत, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, उपाध्यक्ष मयूर राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, नगरसेवक डॉ प्रदीप कुऱ्हाडे, मोहन मडघे, त्र्यंबकराव उमाळे, अमित देशमुख, मयूर राऊत, विलास ठाकरे, शेर खान, उदय तायडे, दिलीप गवई, शरद कनेर, विनोद ढवळे, पप्पू खान, वैभव फूके, प्रदीप पाटील, राजेश सिंग टाक, हितेश उंदरे, गजानन वानखडे, गोलू काळे, घनश्याम कळंबे, प्रफुल खडसे, ऋषीकेश राऊत, मयूर राऊत, राजेश ठाकरे, मयूर राऊत, अमर नागले, शुभम पकडे, धीरज महल्ले, राहुल टाके, किशोर बागडे, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.