मुलाचा तात्काळ शोध घेऊन गुन्हेगारावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22ऑक्टोबर):- विधानसभे आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील साहेब यांची भेट घेवुन पालम येथून अब्दुल सत्तार अब्दुल रऊफ खुरेशी वय ८ वर्ष या मुलाचे दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असून सदरील मुलाचा आजतागायत शोध लागला नाही.

त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीप वळसे पाटील साहेब यांची भेट घेऊन या मुलाचा तात्काळ शोध घेऊन गुन्हेगारावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केलीआहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED