अठरा महिन्यांच्या कालावधीनंतर चित्रपटगृहाचा पडदा उघडला

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.22ऑक्टोबर):-तब्बल अठरा महिन्याच्या कालावधीनंतर चित्रपट गृहाचा पडदा उघडला आहे. राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर याची तयारी चित्रपट गृह चालकांकडून केली जात होती.आज अखेर प्रत्यक्षात चित्रपटगृह खुले झाले असून चित्रपट प्रेमींसाठी ही पर्वणी आहे. बीडमध्ये मुख्य दोन चित्रपट गृह असून याठिकाणी ग्रामीण भागातून प्रेक्षकवर्ग येत असतो.

आज चित्रपटगृह खुली झाली असली तरी पहिल्या दिवशी बीडमध्ये कोणताच पिक्चर प्रदर्शित झाला नसल्यानं चित्रपट प्रेमींमध्ये काहीसा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळाले.प्रत्यक्षात नवीन चित्रपट पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. बरेचसे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानं दिवाळीत पहिला शो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED