अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळविण्यासाठी आंदोलन या हत्याराचा वापर करणे आवश्यक : जिल्हाधक्ष नारायण कांबळे

🔹जिल्हा संघटना आढावा सभा संपन्न

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.22ऑक्टोबर):-संघटना वाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. सतत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळताना दिसत नाही. त्यामुळे ब-याच शिक्षकांवर अन्याय होतो. तो लाभापासून वंचित राहतो. या बाबी प्रशासनाच्या संघटनेने लक्षात आणुन दिल्या पाहिजे. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी आंदोलन हे संघटनेचे हत्यार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाधक्ष नारायण कांबळे केले. ते शिक्षकांच्या प्रलंबित समस्यासाठी जिल्हा संघटना आढावा सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.

शिक्षकांच्या समस्येकडे शासन व प्रशासन सकारात्मक दृष्टिकोनातून का बघत नाही ? याबाबत आता आपल्या संघटनेलाच चिंता व चिंतन करणे आवश्यक आहे. सर्व समस्येचा अभ्यास करून संघटना एक सकारात्मक अहवाल बनवून शासन व प्रशासन मांडण्याच्या तयारीत आहे. याकरिता सर्व सभासदांनी सक्रीय होणे आवश्यक कांबळे म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण कांबळे, विशेष अतिथी राज्यनेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य संघटक प्रकाश पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, जिल्हा नेते दिपक व-हेकर, जिल्हा महिला मंच अध्यक्षा सुनिता इटनकर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप इटनकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर कन्नाके, संचालन लोमेश येनंमुले यांनी केले. उपस्थितांचे आभार निखील तांबोळी यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED