राजापूर गावकर्‍यांच्या सुविधेसाठी १५ फुटाचा बंधारा बांधण्याची गावकऱ्यांची मागणी

27

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.22ऑक्टोबर):-अतिरिक्त पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. गोदावरी नदीला महापूर आला होता. राजापूर गोदावरी नदीच्या काठी असल्यामुळे येथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पुल नसल्यामुळे जीव मुठीत धरून त्यांना प्रवास करावा लागतो.प्रशासनाने राजापूरकरांच्या समस्या जाणून घेत १५ फुट उंचीचा पुल तात्काळ बांधून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. जास्तीचा पाऊस पडल्यानंतर गोदावरी नदीला महापूर येतो. त्यामुळे नदीकाठच्या गावकर्‍यांना सतर्क राहावे लागते.

गेवराई तालुक्यातील राजापूरच्या गावकर्‍यांची दरवर्षी पुलाअभावी दैना होते. याठिकाणी रस्तेही व्यवस्थीत नसतात. यंदा गावकर्‍यांना प्रचंड हाल सहन करावे लागले. गावकर्‍यांच्या सुविधेसाठी पुल बांधण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली.मात्र या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आले. पंधरा फुट उंचीचा पुल बांधल्यानंतर गावकर्‍यांची समस्या सुटू शकते. यासाठी बांधकाम विभागाने गावकर्‍यांची मागणी मंजूर करत १५ फुटाचा पुल बांधावा, अशी मागणी राजापूरच्या ग्रामस्थांसह सरपंच संदीप राजगुरू यांनी केली आहे.