संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात साजरा

🔹नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरीच्या वतीने श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची 255 वी पुण्यतिथी
साजरी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.22ऑक्टोबर):-नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरीच्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची २५५ वी पुण्यतिथी श्री संत नगाजी महाराज देवस्थान कहाली खंडाळा रोड ब्रम्हपुरी उस्ताहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात ख्रिस्तानंद रुग्णालयात रुग्णसेवा व रक्तदान शिबिरापासुन करण्यात आली, नंतर संपूर्ण शहरात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात शहरातील समाज बांधवांनी संपूर्ण सलुनचे दुकान बंद ठेवत कार्यक्रमात सहभागी दर्शविला. त्यानंतर समाजातीलच महिलांनी नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

त्यानंतर पुण्यतिथी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री अशोक रामटेके (उपाध्यक्ष नगर परिषद ब्रम्हपुरी ) मनोजजी वठे, नगर सेवक ब्रम्हपुरी, केशवरावजी सूर्यवंशी, दत्तुजी मेश्राम ,राजीरामजी फुलबांधे , जयदेवजी खळशिंगे, दिवाकरजी फुलबांधे, गुरुदेव सूर्यवंशी , प्रा डॉ अशोक सालोटकर, सुंदरलाल फुलबांधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माणिकजी मेश्राम हे होते.

सदर कार्यक्रमात ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे सत्कार करण्यात आले, सोबतच समाजातील कोरोना योद्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोलू फुलबांधे, सुत्रसंचलन प्रा.लक्ष्मण मेश्राम सर, तर आभार प्रदर्शन उदयकुमार पगाडे यांनी केले.

प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे अध्यक्ष श्री.विलास सुर्यवंशी, अजय खळशिंगे, विनय मेश्राम, तुषार पगाडे, प्रणव सूर्यवंशी, विलास दाणे, श्रावण येळणे, पितांबर फुलबांधे, मयुरभाऊ मेश्राम, मोरेश्वर मेश्राम, सुयोग मेश्राम, जितू फुलबांधे व सदस्य गण यांनी अथक परिश्रम केले.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED