म्हसवड येथे उध्या वंचितची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन:रणजित सरतापे

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.23ऑक्टोबर):-आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर वंचित बहुजन आघाडी माण तालुक्यावतीने उध्या रविवार दि.24 ऑक्टोबर रोजी दुपारी 13 वाजता म्हसवड,ता.माण,जि. सातारा (हॉटेल बागायतदार) येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केल्याचे वंचित बहुजन आघाडी तालुका युवा अध्यक्ष रणजित सरतापे यांनी सांगितले.

यावेळी या बैठकीत आगामी होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात महत्वपुर्ण चर्चा होणार असून,नवीन शाखा निर्माण करणे,कार्यकर्ता शिबीर,मतदार यादीमध्ये मतदार नोंदविणे अशा अनेक विषया वर चर्चा होणार असून तालुक्यातील महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित केल्याचे सांगितले.

या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र समनवयक चंद्रकात खंडाईत,जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई,जिल्हाउपाध्यक्ष सुभाष गायकवाड,तालुका अध्यक्ष युवराज भोसले ,जिल्हा सचिव सुनील कदम, माण तालुका कोषाध्यक्ष संतोष घाडगे,माण तालुका युवक अध्यक्ष रणजित सरतापे हजर राहणार आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED