सभुखेड येथील जवानाचा राजस्थानमध्ये मृत्यू

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.23ऑक्टोबर):-संभुखेड येथील सुपुत्र जवान सचिन विषवनाथ काटे यांचा राजस्थान येथे देशसेवा बजावत असताना मृत्यू झाला आज (शनिवार) संभुखेड,ता.माण,जि. सातारा येथे त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी राजस्थान मधील बाडमेर येथे जासई मिलिटरी केन्टोन्मेंट येथे सचिन काटे देशसेवा बजावत होते 20 ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते मध्यरात्री ते आपले कर्तव्य बजावत असताना पहाटे चार वाजता पुन्हा त्याची ड्युटी होती पण ते ड्युटीवर न आल्याने त्याच्या सहकारी यांनी शोध सुरू केला शोध घेत असताना सचिन हे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले.

जवानांनी तात्काळ त्यांना लष्करी रुग्णालयात नेले असता तेथील डॉकटर यांनी त्यांना मृत घोषित केले.पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून लष्करानेही तपासाचे आदेश दिले आहेत अशी माहिती पोलीस स्टेशन हाऊस ऑफिसर परबत सिग यांनी सांगितले.सचिन हे शहीद झाल्याचे समजताच माण तालुक्यात हळहल व्यक्त झाली अनेक तरुणांनी आणि तालुक्यातील नागरिकांनी त्याचा आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून त्यांना श्रध्दांजली वाहिली.त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे.