मुद्रीत (PRINTED) पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेब पोर्टलवर जाहिरात प्रकाशित

114

🔹अभिनव योजनेला मिळत आहे उत्तम प्रतिसाद

चंद्रपूर – हिंदी-मराठी साप्ताहिक पुरोगामी संदेश जाहिरातदारांसाठी दीपावलीची भेट म्हणून “मुद्रीत पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेबपोर्टलवर जाहिरात प्रकाशित” ही अभिनव योजना आखली असून या योजनेला जाहिरातदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संपादक सुरेश डांगे यांनी दिली.

पुरोगामी संदेश दीपावली विशेषांकमध्ये सहयोग राशी देऊन प्रकाशित झालेली जाहिरात पुरोगामी संदेश वेब पोर्टलच्या दिवसभरातील सर्व बातम्यात दीपावलीच्या पाच दिवस जाहिरात मोफत प्रकाशित करण्यात येईल. ही योजना वाचकापर्यंत पोहचतात भ्रमणध्वनीवर बोलून जाहिरातदार सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत १९४२ च्या चलेजाव आंदोलनात महत्त्वपूर्ण भुमिका बजावणा-या चिमूर (जिल्हा चंद्रपूर) येथून १३ मे २०१३ पासुन साप्ताहिक पुरोगामी संदेश प्रकाशित होत आहे. पुरोगामी संदेश वेब पोर्टलवर महाराष्ट्रातील ३५ प्रतिनिधीच्या सहकार्याने दिवसभरात ३० ते ३५ बातम्या प्रकाशित करीत आहेत. दरवर्षी प्रमाणे “साप्ताहिक पुरोगामी संदेश दीपावली विशेषांक” जाहिरातदारांच्या सहकार्याने प्रकाशित आहेत. यावर्षी “मुद्रीत पेपरला दिली जाहिरात तर पाच दिवस मोफत होणार वेबपोर्टलवर जाहिरात प्रकाशित” ही अभिनव योजना सुरु केली आहे. या योजनेची माहिती महाराष्ट्रातून अनेक व्यापारी प्रतिष्ठान, उद्योजक, भ्रमणध्वनीद्वारे घेत आहे. प्रत्यक्षात किती जाहिराती मिळतील हा विषय दुय्यम असला तरी या निमित्याने पुरोगामी संदेश महाराष्ट्रात पोहचण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती संपादक सुरेश डांगे यांनी दिली.