उपवनसंरक्षक कार्यालयातील गैरकारभाराच्या विरोधात *आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

🔸बहुचर्चित वादग्रस्त उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या विरोधात सर्वाधिक 190 तक्रारी शासन प्रशासन दरबारी प्राप्त आहेत

✒️प्रतिनिधी बुलडाणा(मनोज नगरनाईक)

बुलडाणा(दि.23ऑक्टोबर):-आझाद हिंद सरकारच्या स्थापना दिनापासून (21आँक्टोबर) बहुचर्चित वादग्रस्त उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या गैरकारभाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणाच्या समोर आझाद हिंद च्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.आझाद हिंद युवक शेतकरी संघटनेचे संघटक इमरान शाह व आझाद हिंद महिला संघटनेच्या वरवट बकाल ग्राम शाखा अध्यक्ष श्रीमती लीलाबाई रामदास दामोदर यांनी प्राथमिक टप्प्यातील आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे.

बुलडाणा जिल्हा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या विरोधात जिल्ह्यातील आजी,माजी आमदारांच्या व असंख्य नागरिकांच्या 190 लेखी तक्रारी असतानांसुद्धा आज पर्यंत एकही चौकशी का करण्यात आली नाही..? यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांनी मागील सहा महिन्यांपासून अक्षय गजभिये यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आझाद हिंद च्या वतीने आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात आहे.

वन मजूराला रोपवाटिकेत कार्यरत दाखवून अपहार करणे, नियम बाह्य कामावरून कमी करणे, तर अनुकंपा च्या यादीत नाव असतानांसुद्धा नियमबाह्य नियुक्ती थांबवणे, नियमबाह्य नियुक्ती दाखवून शासनाच्या निधीचा गैरव्यवहार करणाऱ्या उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसह विविध सामाजिक मागण्यांसाठी
आमरण सलग दुसऱ्या दिवशीही सुरु आहे.

*तर..48 तासात मागण्यांची पूर्तता न झाल्यास..*
आझाद हिंद शेतकरी संघटना रास्ता रोको करणार असल्याचे विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी उपोषण मंडपाला भेट देत जाहीर केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED