आदर्श शिक्षक पवार यांना कुबेर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने ग्रंथ देऊन सन्मानित

24

🔸आदर्श शिक्षक पवार यांना कुबेर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने ग्रंथ देऊन सन्मान

✒️ धरणगाव प्रतिनिधी – पी. डी.पाटील.

धरणगांव(दि.23ऑक्टोबर):- येथील कैलास पवार सर यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा कुबेर पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल बहुजन क्रांती मोर्चा, धरणगांवच्या वतीने कैलास पवार सर यांचा कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर अनमोल ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील रहिवासी व पिंपळे बुद्रुक येथील उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक कैलास पवार यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा “कुबेर पुरस्कार” प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि साहित्यिक तसेच कुबेर समुहाचे जिल्हा समन्वयक प्रा.बी.एन.चौधरी, निलेश भांडारकर, रेखा पाटील यांच्या हस्ते जळगाव येथील जोशी प्लाझा सभागृहात देण्यात आला. त्यांनी जि.प.शाळा धाबे, जि.प.शाळा दगडी सबगव्हाण ता. पारोळा, जि. प.शाळा शामखेडे तालुका धरणगाव या शाळांचा कायापालट केल्याबद्दल त्यांना आतापर्यंत ३० पुरस्कार मिळाले असून त्यात दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीतर्फे आंबेडकर फेलोशिप तर जि.प.जळगाव तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचा देखील समावेश आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष विलास भाऊ महाजन, ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य तथा बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, बामसेफचे जिल्हा महासचिव हेमंत माळी, बामसेफचे तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, प्रोटान शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य प्रभुदास जाधव, सामाजिक कार्यकर्ते महादु अहिरे, अमोल सोनार, शैलेश महाजन, बिंदीलाल बडगुजर, भैय्या बडगुजर, आदींनी अभिनंदन केले.