संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्ती सप्ताहाचे समारोप

33

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.23ऑक्टोबर):-संजीवनी व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केन्द्र तळोधी (बाळापुर) च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती समारोहांतर्गत व्यसनमुक्ती सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे व्यसनमुक्ती केंद्रात आयोजन केले होते. केंद्राचे प्रकल्प अधिकारी एस. डी. लाडे यांनी दीप प्रज्वलन करून महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे संचालन एस. जी. मोहुर्ले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डी. बी. खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता केंद्रातील कर्मचारी ए. एस. कुरेशी, आर. के. फुकट, पी. झेड. रामटेके, ए. बी. पाटील, ए. एच. अलोणे, एस. डी. मशाखेत्री, चंद्रशेखर खोब्रागडे, लेशपांडे, टेंभूरकर, सूर्यवंशी, मलगाम व केंद्रातील भरती रुग्णमित्र उपस्थित होते.