पिप्री येथे सर्वधर्मीयांच्या महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरा

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

धुळे(दि.23ऑक्टोबर):-आज दि.23/10/2021रोजी शहादा तालुक्यातील पिप्री या गावात आदिवासी टोकरे कोळींच्या वाल्मिकी उत्सवात गावातील सर्व जातीधर्मातील लोकांनी सहभागी होऊन संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आदर्श घालून दिला… पिप्री या गावात महर्षि वाल्मिकी जयंती संपूर्ण गावाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली….यावेळी पिप्री वाल्या सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र दारूबंदी महिला/ युवा मोर्चा च्या प्रमुख व वाल्या सेनेच्या मार्गदर्शक सौ गीतांजली कोळी यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी ऋषींच्या फलकाचे अनावरण करण्यात आले….त्यानंतर सौ गीतांजली कोळी यांनी समाज प्रबोधन कार्यक्रमात महर्षी वाल्मिकी ऋषींच्या कार्याचा गौरव करून दारूबंदी संदर्भात जबरदस्त भाषण करून युवा पिढीला व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले…

तसेच आदिवासींच्या विविध योजना यावर देखील चर्चा करून त्यासंदर्भात मार्गदर्शन केले…गेल्या दहा महिन्याच्या कमी कालावधीत संपूर्ण खान्देश भर आपल्या धडाकेबाज कार्यशैली साठी नावाजलेल्या वाल्या सेनेच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचे प्रत्येक चांगल्या कार्यासाठी अभिनंदन करून गीतांजली कोळी यांनी गावातील वाल्या सैनिकांचा सत्कार केला…तसेच याप्रसंगी लहान मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी पिप्री गावात छोटेसे महर्षी वाल्मिकी ऋषी वाचनालय ही गीतांजली ताईंनी सुरू करून लहान मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली तसेच येत्या काळात अजून पुस्तके उपलब्ध करून देण्याचे सांगीतले.

यावेळी वाल्या सेनेचे मयूर कोळी, संजय कोळी, विशाल कोळी, उमेश कोळी, राहुल कोळी शांतीलाल कोळी, जगन्नाथ कोळी,विनोद कोळी, सचिन कोळी यांच्या सह अनेक वाल्या सैनिक तसेच हेमंत सुर्यवंशी, कृष्णा कोळी, यांच्या सह आजूबाजूच्या गावातील आदिवासी टोकरे कोळी जमात बांधव व गावातील सरपंच श्री आबासाहेब पावरा, नानासाहेब गुर्जर, ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील यांच्या सह गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
वाल्या सेना ग्रृप खान्देश

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED