देवणी(लातूर) येथे 26 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय समाज पकशातर्फे ताला ठोको आंदोलन जाहीर !!

31

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७0

लातुर(दि.23ऑक्टोबर):-देवनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक दांडीबहाद्दर डॉक्टर सगर यांना तात्काळ निलंबित करून दुसरे अधीक्षक भरण्यात यावे अशी मागणी शहर व तालुक्याच्या वासी यांच्यावतीने करण्यात आली.

मौजे देवनी येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून परंतु त्या ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जाप्रमाणे विविध सुविधेचा अभाव आहेत व इथले अधीक्षक दांडी भहाद्दर डॉक्टर सगर यांना तात्काळ निलंबित करून दुसरे अधीक्षक नेमण्यात यावे डॉक्टर सगर गेल्या सहा महिन्यापासून चार वेळा ही उपस्थित राहत नाहीत व तसेच स्टॉप ही कमी आहेत म्हणून इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक व स्टॉप मुळे शहरातील व देवणी तालुक्यातील जनतेला अती त्रास होत असून तरी आजतागायत ग्रामीण रुग्णालयात विवीध सुविधेचा अभाव जाणवत असून हे रुग्णाच्या जीवाशी बेतले जात आहे.

यात प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक चार आठवडेत येक वेळा सुधा येत नसल्यामुळे व महिन्यातून एक वेळा यायचं बाकीच्या कर्मचाऱ्यांना धाकधूक करायचे सह्या करून पगारी उचलायचे स्वतःचे हॉस्पिटल निलंगा येथे चालवायचे या अति त्रासाला कंटाळून गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार देवणी शहरातील व तालुक्यातील जनतेने निवेदने देऊन सुद्धा या भ्रष्ट व दांडीबहाद्दर डॉक्टर सागर यांना अध्याप निलंबित करण्यात आले नाही म्हणून शहर व तालुक्याच्या वाशी यांच्या वतीने दिनांक 26.10. 2021 ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे या दांडीबहाद्दर अधीक्षक डॉक्टर सागर यांच्या त्रासाला कंटाळून ईथले दोन डॉक्टर सुद्धा राजीनामा दिलेले आहेत व तिथला स्टॉप कमी असून त्यांना चोवीसतास अटे चाळीस तास नोकरी कराव लागत आहे तरी त्या कर्मचाऱ्यांना डॉक्टर सगर वारंवार अरे तुरे ची भाषा वापरतात या सर्व गोंधळामुळे देवनी शहर व तालुक्यातील नागरिकांचा अतोनात नुकसान होऊन जीव गमवावा लागत आहे म्हणून 26.10.2021 तारखेला ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनास शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिक उपस्थित राहणार आहे तात्काळ यांना निलंबित करून दुसरे अधीक्षक देण्यात यावे उपस्थित आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील राष्ट्रीय समाज पक्ष नेते जितेंद्र सीवगे योगेश तगर खडे श्रीमंत अण्णा लुले अमित सुरवंशी चेतन मिटकरी राहुल बिरादार अमोल जीवने संदीप मंगलगे मुन्ना लुल्ले प्रमोद पुरी असे अनंत कार्यकर्ते उपस्थित होते