आमदार,खासदारांनी दिव्यांग निधी तात्काळ खर्च करावे – समीर पटेल

25

🔹नांदेड जिल्ह्यात पाच ते सात कोटी दिव्यांग निधी अखर्चीत

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.23ऑक्टोबर):- जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ व तसेच विधान परिषदेचे दोन आमदार आणि दोन खासदार असुन, 12 जुलै 2016 च्या शासन निर्णयानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा व विधान परिषदेच्या आमदारांनी प्रती वर्ष 10 लक्ष रुपये तर खासदारांनी प्रती वर्ष 25 लक्ष रुपये दिव्यांगावर दिव्यांग निधी दर वर्षी खर्च करणे बंधनकारक आहे. व तसेच दिव्यांग निधी हा ईतर कोणत्याही कामासाठी दिव्यांग निधी खर्च करता येत नाही. नांदेड जिल्ह्यातील मागील 5 ते 6 वर्षा पासुन जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी दिव्यांगावर हा दिव्यांग निधी खर्च केला नाही. असे मत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केले आहे.

नांदेड जिल्ह्यात दिव्यांग मित्र अॅप मध्ये जवळ पास विस ते पंचवीस हजार दिव्यांग व्यक्तीनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

व तसेच नांदेड जिल्ह्यातील आमदार राजेश पवार वगळता ईतर सर्व आमदार व खासदारांनी व तसेच माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सुध्दा दिव्यांगावर दिव्यांग निधी वेळेवर खर्च केला नाही. व तसेच कोरोणा संकट काळाच्या माहामारीत सुध्दा दिव्यांगाला कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नसल्याची खंत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केली आहे.

नांदेड जिल्हातील सर्व आमदार व खासदारांनी दिवाळी पुर्वी दिव्यांगाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अन्यथा आदर्श आचारसंहिता संपताच जिल्हयातील सर्व खासदार व आमदाराच्या कार्यालयावर अति तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांना भ्रमणध्वनी वरुन दिला आहे. त्यावेळी त्याच्या सोबत जमीर पटेल, कुबेर राठोड, अजिंक्य चव्हाण, फारुख कुरैशी, गजानन शिंगणे, शेख अहेमद भाई, प्रियंका राठोड, शेख साजिद, रमेश गोडबोले, सलमा शेख, धुरपत सुर्यवंशी, मारोती लांडगे यासह अनेक दिव्यांग व्यक्ती हजर होते…