शिक्षणासोबतच समाजाने संस्कृती जोपसावी:- गजानन जुमनाके

26

🔹चणई येथे दसऱ्या निमित्त गोंडी सप्तरंगी झेंडावंदन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.23ऑक्टोबर):- शिक्षणातून नव्या पिढीचे कल्याण होते. हे स्पर्धेचे युग आहे. आता त्यासाठी गावागावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल. तर महान व्यक्तींचे चरित्र अभ्यासून त्यातून मिळणारी स्फूर्ती तुमच्या जीवनाच कल्याण करेल. नव्या पिढीने शिक्षणासोबतच समाजाची संस्कृती जोपसण्याची गरज आहे. असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले.

चणई येथे आयोजित दसऱ्या निमित्त गोंडी सप्तरंगी झेंडावंदन कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी सीताराम कोडापे माजी जिल्हा परिषद सदस्य, राज गोंडवाना गड- किल्ले संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा महासचिव भारत आत्राम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जीवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, जितू मडावी, मधुकर मडपती, हिरापूरचे सरपंच प्रमोद कोडापे, चणई चे सरपंच अरुण मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा कोरपना तालुका उपाध्यक्ष सोमेश्वर कुमरे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन चणई येथील आदिवासी समाज बांधवांनी केले.