🔸शेघाट येथील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.24ऑक्टोबर):-शेंदूरजना घाट मलकापूर परिसरातील विकसकामांकरिता 38 लक्ष 77 हजार 804 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट शहरालगत मलकापूर येथील प्रभाग क्रं 8 मध्ये प्रभाकर उबनारे यांच्या घरापासुन ते पंढरी दवंडे यांच्या घरापर्यंत ते धनोडी रस्ता पर्यंत काँक्रिट रोडचे बांधकाम करण्याकरिता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार याची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत 27 लक्ष 94 हजार 590 रुपये निधी उपलब्ध करून दिला असून शेंदूरजनाघाट शहरालगत मलकापूर येथील प्रभाग क्रं.8 मधील झोपडपट्टी परिसरात समाज मंदिर बांधकाम करणे करिता जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत नगरपरिषद शेंदुरजनाघाट येथे 10 लक्ष 83 हजार 214 रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे या दोन्ही विकासकामाकरिता आमदार देवेंद्र भुयार यांनी 38 लक्ष 77 हजार 804 रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शेघाट मलकापूर परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले .
आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नेहमी धडपड करणारे आ. देवेंद्र भुयार यांनी शेघाट मलकापूर येथे 38 लक्ष 77 हजार 804 रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले.

त्यावेळी बांधकाम सभापती वर्षाताई घोरपडे, ऋषिकेश राऊत, संदीप खडसे, गौरव गणोरकर, सौ.सुनीताताई वंजारी सदस्य, नगरसेवक भुपेंद्र कुवारे, शिवसेना शहर प्रमुख अजय सरोदे, लोकेश वंजारी, रविंद्र वंजारी, अनिल आंडे, शिवराज शेंडे, आनंदराव देशमुख, आशिष अढवू, प्रशांत भंडारे, सतीश काळे, वैभव श्रीखंडे, संजय थेटे, जिवन वंजारी, रवीभाऊ वंजारी, नामदेवराव कळंबे, रामेश्वर वरखडे, मनिराम कुमरे, सैनाबाई धुर्वे, रामकली कुमरे, सुकबती परतेती, मुन्नीबाई टेकाम, कमलाबाई परतेती, फुलवंती धुर्वे, मुन्नालाल कुमरे, कोयलिबाई वाडीवे तसेच परिसरातील पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED