समाजच्या विविध प्रश्नांवर प्रतिष्ठान सातत्याने काम करत राहणार – तुळशीराम वाघमारे

42

🔸मंत्री तथा पालकमंत्री ना.श्री.धनंजय मुंडे यांची भेट व विविध मागण्यांचे निवेदन

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.24ऑक्टोबर):-समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी,समाजावरील अत्याचार,महिला वरील होणारे अन्याय त्याच बरोबर चर्मकार समाजाला मिळणाऱ्या विविध योजना ह्या तात्काळ मार्गी लावत संत रविदास चर्मकार तथा चर्मोद्योग महामंडळाच्या योजना आणि त्यासाठी निधीची कमतरता भासू देऊ नये अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या कडे संत रविदास प्रतिष्ठान चे तुळशीराम वाघमारे,आप्पा सोनटक्के यांच्यासह पदाधिकारी यांनी केली.

संत रविदास प्रतिष्ठान मार्फत आजपर्यंत समाजहित डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांनी काम आणि कार्य केले पुढे ही समाज बांधव आणि भगिनीं यांच्या हिता बरोबर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम समाजहिताचे कार्य करत आहेत.त्याच बरोबर समाजातील सर्वांना सोबत घेऊन अन्याय, अत्याचारच्या विरोधात आग्रही भूमीकाघेत महाराष्ट्रात काम केले आहे. संघटना जरी अराजकीय असली तरी राजकीय लोकांना काम करण्यास भाग पडून तसेच राजकीय लोकसेवक,जनसेवक व पदाधिकारी यांच्या कडून काम मार्गी लावण्यास विनंती करून कामे करून घेऊन समाजाला न्याय देण्यास प्राधान्य देण्यात प्रतिष्ठान ची भुमीका आहे. प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत विविध मार्गांनी समाजबधवांना निस्वार्थ मदत करत केली आहे .काही गोष्टी शासन आणि प्रशासन यांच्या मार्फत सोडवण्यासाठी पर्यंत करत आहेत.

वेळप्रसंगी समाजहिताच्या कामी कोणाच्या ही पुढे समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी पर्यंत करुत ही भूमिका आहे असे मत प्रतिष्ठान चे तुळशीराम वाघमारे यांचे असून दिनांक- 23 रोजी बीड येथे ओबीसी कृतज्ञता मेळाव्यात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री मा. ना. श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा महात्मा फुले समता परिषद चे संस्थापक / अध्यक्ष मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत भेट घेऊन समाजाच्या विविध अडचणी संदर्भात निवेदन दिले. यावेळी खूप लोकांची गर्दी होती परंतु त्या क्षणीही निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद मा.मुंडे साहेबांनी देत काम मार्गी लाऊत असे आश्वासन दिले.यावेळी पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे तुळशीराम वाघमारे,प्रभारी अध्यक्ष आप्पा सोनटक्के,बाळासाहेब राऊत,प्रशांत उनवणे,जितेंद्र खरात,समता परिषद चे गेवराई तालुकाउपाध्यक्ष गणेश काळे,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते