महाकोशल बुद्ध विहारात ग्रंथ समाप्ती (वर्षवास) उत्साहात पार पडला

✒️विशाल इंगोले(विशेष प्रतिनिधी)

सेवाग्राम(दि.24ऑक्टोबर):- महाकोशल बुद्ध विहार व यशोधरा महिला मंडळ हावरे ले-आऊट सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहारात बौद्ध भिक्षुणी सुकेशीनी यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध गौतम बुद्ध, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले. महाकोशल बुद्ध विहार समितीचे रमेश येसंबरे यांच्या हस्ते भिक्षूणी सुकेशीनी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

त्यानंतर यशोधरा महिला मंडळांनी बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना घेण्यात आली. बौद्ध भिक्षूनी सुकेशीनी यांनी धम्म प्रवचन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महाकोशल बुद्ध विहार समितीचे सचिव रजनीश फुलझेले यांनी केले तसेच हा कार्यक्रम यथोचित पार पडवा म्हणून यशोधरा महिला मंडळींनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी, सदस्य, व यशोधरा महिला मंडळ, असंख्य उपासक उपासिका उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED