कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने पुस्तके वाटप कार्यक्रम संपन्न..

27

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.24ऑक्टोबर):-येथील कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेतांना पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. रात्री लहान माळी वाडा समाज पंच कार्यालयात झालेल्या ह्या छोटेखानी कार्यक्रमात विजयी स्पर्धकासह असंख्य नागरीक सहभागी होते. तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, चंदनगुरू क्रिडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मराठे,सामाजिक कार्यकर्ते बंडु सोनार,व दिलीप महाजन व राजेद्र महाजन उपस्थित होते.

प्रारंभी प्रास्ताविकात जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाची माहीती देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्याचा कर्तव्य बहुउद्देशिय संस्थेचा वतीने सत्कार करण्यात आला व प्रमुख पाहुण्याचा हस्ते स्पर्धेत प्रथम आलेल्या सौ.शितल भागवत मराठे, कृष्णा दिलीप महाजन, मयुरी रविद्र महाजन, खुशी ज्ञानेश्वर चौधरी, व किर्ति दिलीप महाजन, यांना छत्रपती शाहु महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, सह विविध क्रांतीविरांची पुस्तके भेट देण्यात आली.

आपल्या मनोगतातुन संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी आजचा सामाजिक व्यवस्थेत अडकलेला समाजात जागृती निर्माण व्हावी व समाजात वाचन संस्कृती रूजावी तसेच भविष्यात वाचनाची आवड निर्माण झाल्यावर त्यातुन चांगले संस्कारमय पीढी उभी राहील असा विश्वास व्यक्त करून रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या .

सुत्रसंचालन व आभार श्री स्वामी समर्थ काॅम्प्यूर्स चे संचालक गुलाब महाजन यांनी मानले कार्यक्रम यशस्वी साठी दिनेश माळी, इश्वर चौधरी, दिलीप महाजन, पंकज पाटील, अशोक झुंजारराव, आदींनी परीश्रम घेतले.