शेतकरी बांधवांना पटवून दिले जलशुध्दीकरणाचे महत्त्व!

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद (दि.24ऑक्टोबर):-डॉ. पंजाबराव देशमुख उमरखेडच्या विदयार्थ्यांनी, ग्रामीण भागात नकळत दूषित पाणी प्यायला जाते. त्यामुळे साथीचे अनेक आजार उद्भवले जातात. म्हणून पाण्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे उमरखेड येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी जलशुध्दीकरणाचे महत्व पटवून देतानाच जलशुद्धीकरण करण्याबाबत प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण दिले.

यावेळी कृषी महाविद्यालय उमरखेड येथील विध्यार्थी संकेत वाठोरे, प्रतीक हांडे यांनी पाण्याचे सुधीकरण कशाप्रकारे करावे याबाबतचे प्रात्यक्षिक ग्रामस्थांना करून दाखविले पावसाळ्यात गावातील पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या विहिरीमध्ये दूषित पाणी जमा होत असते. त्यामुळे पाणीपुरवठा होत असताना नळाच्या माध्यमातून दूषित पाणी घरोघरी पिण्यासाठी पुरवठा केला जातो. तेव्हा दूषित पाण्यामुळे साथीचे अनेक रोग पसरतात व अनेक रोगांना.सामोरे जावे लागते, ही समस्या उदभवू नये,म्हणून पाण्याचे शुद्धीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे..

विदयार्थ्यांनी ग्रामस्थांना पटवून दिले. या प्रशिक्षण कार्यक्रम बोरगडी, पुसद येथील विहिरीवर करण्यात आला.या प्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चितले पा. आनंद राऊत, प्रा. वाय एम वाकोडे सर व ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा. सपकाळ सरांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED