जय गजानन जगदंबा उत्सव मंडळाचा कोरोना लसीकरण उपक्रम अभिनंदनीय-आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

🔸जय गजानन जगदंबा उत्सव मंडळाच्या वतीने लसीकरण मोहिम संपन्न

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.24ऑक्टोबर):- खामगांव शहरात अनेक मंडळाच्या वतीने जगदंबा उत्सव हर्शोल्हासात साजरा केला जात असून उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यशोधाम कॉलनी व गजानन कॉलनी भागातील जय गजानन जगदंबा उत्सव मंडळाच्या वतीने जगदंबा उत्सवानिमित्त दि.24 ऑक्टोबर 2021 कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,नगरसेवक किशोरआप्पाभोसले,बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देषमुख,एनएसयुआयचे शहरअध्यक्ष रोहित राजपूत,जय गजानन मंडळाचे नारायण पिठोरे,सुभाश राऊत, निलेश राजपुत,गजानन राऊत,अरुण देशमुख यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जगदंबा मातेचे पुजन करुन दर्शन घेतले.तद्नंतर आयोजकांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह सर्व मान्यवरांचे पुश्पहार घालुन स्वागत करण्यात आले. कोरोना साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी मंडळाने लसीकरणाचा विधायक उपक्रम राबविल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जय गजानन जगदंबा उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासुन अभिनंदन केले.

यावेळी यशोधाम कॉलनी,गजानन कॉलनी,समर्थ नगर परिसरातील अनेकांनी लसीकरण करुन घेतले.या लसीकरण शिबिरासाठी सामान्य रुग्णालयाच्या डॉ.प्राची निचळ,सुमन महात्रे,एैष्वर्या गवई, रमेश अवचार,प्रियंका जाधव,प्रिती बोरे, नंदा माळवंदे,भारती चोपडे, उषा मुंडीवाले,कवीता सवडतकर या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्याकरीता पल्हाडे सर, कलोरे सर,श्रीकांत नायसे,संजय देशमुख, अरुण फुटाणे, रामेष्वर चौधरी, कृश्णा फुटाने, प्रकाश पाटील, राजेश पन्हाळकर, परशुराम थिटे, रणजित जैस्वाल, उमेश फुटाने,गजानन जोशी महाराज, अनिल सावंग, गजानन फुटाने,खत्रीजी,सौ.पिठोरे, सौ.पवार, सौ.राजपुत यांच्यासह जय गजानन जगदंबा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED