जयश्री राम करत शिवसेनेत शहरप्रमुख म्हणुन भट्टड

68

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.25ऑक्टोबर):-घाटाखालिल खामगाव शहरामध्ये मागिल काही महिन्यापासुन सुनेसुने असलेले शहरप्रमुखपद हे रिक्त होते.

यापदा वर शहरातिल कट्टर प्रमुख शिवसैनिक गजानन ऊटाळे,निलेश देवताळु,याचेसह सामाजिक कार्यकर्ते नंदु भट्टड यांची तिव्र ईच्छा असतांना त्यांना डावलत अचानकच नविन चेहरा असलेले अँड. बाबु भट्टड यांना शहरप्रमुख यापदावर शिवसेना संपर्क प्रमुख वा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी बाबु भट्टड यांना नियुक्तीपत्र दिले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय अवताळे,तालुका प्रमुख सुरेश वावगे, विधानसभा प्रमुख हरिदास हुरसाड हे हजर होते.अत्यंत मनमिळावु सौम्य असलेले व व्यवसायाने वकिल असलेले भट्टड हे पक्ष वाढीसाठी कितपत काम करतिल हा येणारा काळच ठरवेल.