कॉम्रेड कोंडबाराव थोरात (शाहीर) यांचा स्मृतिदिन साजरा

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

ईसापुर(दि.25ऑक्टोबर):- धरण येथील
कालवंश कॉम्रेड कोंडबाराव थोरात यांना 24/10/2021 रोजी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या विचारांना, अभिवादन,करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले ईसापुर धरण या गावचे रहिवासी असलेले कोंडबाराव थोरात कॉम्रेड म्हणून ओळखले जातात त्यांना ढोलकी वाजवण्याची कला अवगत होती कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हटलं की ते शाहीर, प्रबोधनकार, अशा विविध अंगाने या पक्षाची संबंधित कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो व ते प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या पक्षाची विचारधारा समाजापुढे मांडत असतात अशापैकी ईसापुर धरण येथील शाहीर कोंडबाराव थोरात हे कॉम्रेड म्हणून ओळखल्या जातात परंतु मराठवाड्यामध्ये कॉम्रेड असलेल्यां कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे.

परंतु कोंडबाराव थोरात हे मात्र स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा यापासून अजूनही वंचित आहेत म्हणून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त इसापूर धरण येथील स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सभेच्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा मिळावा याकरिता विविध कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले की कोंडबाराव थोरात यांना इतर कॉम्रेड कार्यकर्त्या प्रमाणे स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा मिळावा असे मत या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आले.

या स्मृतीदिनाला प्रमुख म्हणून, ईसापुर नगरीचे सरपंच, भास्करराव थोरात, डॉ. प्रकाशराव नाईक माजी सभापती आनंदराव नाईक डॉ.विलासराव डंगाले उत्तमराव ढोले
गौतमराव थोरात पि.एन.थोरात (माजी सैनिक) भास्करराव बैस शेख हाशमभाई सुरेश थोरात विश्वदीप थोरात (पोलिस पाटील) ज्योतिबा थोरात ग्रा.प.सदस्य व गावातील समाज बांधवांनी श्रद्धांजलीचा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला.