राजस्थानी महिला मंडळाच्या उद्योजक महिला प्रदर्शन व विक्री ला प्रतिसाद

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25ऑक्टोबर):-राजस्थानी महिला मंडळातर्फे दिनांक 21 व 22 ऑक्टोबर रोजी शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील उद्योजक महिलांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने उद्योजक महिला प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात 50 महिला उद्योजकांनी आपापल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन घडवले. त्यात हस्तनिर्मित खेळणी ,कपडे, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्वेलरी व इतर गृह उपयोगी साहित्य यांचे विविध स्टॉल द्वारे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.

या कार्यक्रमास शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रेमलता नावंदर व सरोज मानधना यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा तोष्णीवाल,सचिव वर्षा भुतडा, सहसचिव सारिका बंग,योगिता भंडारी, सहकोषाध्यक्ष शरयू धूत,कीर्ती बंग,सरस्वती बंग, मेघा दायमा यांनी परिश्रम घेतले.