✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.२५ऑक्टोबर):- (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने राज्याचे नेते मा.प्रकाशजी लोंढे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे साहेब यांची भेट घेऊन वरील आशयाचे निवेदन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदनाचा आशय असा आहे..

की १) महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये अनुदान द्या….!*
*२) पेट्रोल डिझेल गॅस च्या किमती त्वरित कमी करा….!*
*३) राज्यात महिलांवरील होणारे अन्याय-अत्याचार त्वरित थांबवावे….!*
*४) ओबीसी मराठा मुस्लिम समाजाला तात्काळ आरक्षण द्या….!*
*५) मागासवर्गीय कुटुंबांवरती होणारे अत्याचार त्वरित थांबवा व ह्या आधी मागण्यांचा आपण सहानुभूती पूर्वक विचार करून राज्य व तसेच केंद्र सरकारला ह्या विषयी त्वरित पत्र पाठवून आमच्या मागण्या मान्य कराव्यात….!*
*ह्या संबंधी विषयाचेनिवेदन देण्यात आले..!*

*ह्याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,रिपाई नाशिक महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मा.गुंफाताई भदरगे, जिल्हा नेते मा.सुनिलभाऊ निकम,आंबेडकरी चळवळीतील युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते समाधान जावरे, नम्रताताई निकम, उमेश चव्हाण, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…!*

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED