आष्टी,जि.बीड तहसिलदार पदी विनोद गुंड्डमवार

28

🔹सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – गुंड्डमवार

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

देगलूर(दि.25ऑक्टोबर):- जि.नांदेड येथून आष्टी येथील तहसिलदार पदी आलेले विनोद गुंड्डमवार यांनी सोमवार दि.२५ रोजी आष्टी तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.गेल्या पंधरा दिवसापासून तहसिलदार पद रिक्त असल्याने या जागेवर देगलूर येथील नायब तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांची नियुक्ती झाली होती.परंतु बदली होवूनही कर्तव्यावर रूजू न झाल्याने येथील तहसिलदार पदाचा पदभार नायब तहसिलदार बळवंत मोरे यांना देण्यात आला होता.

सोमवार दि.२५ रोजी आष्टी तहसिलदार पदी विनोद गुंड्डमवार यांनी आष्टी तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.आष्टी तालुक्याचे नाव आम्ही खुप दिवसापासून ऐकून होतोत,आज येथे काम करण्याची संधी मिळाली आहे.येत्या काळात आष्टी तहसिलमध्ये सर्वसामान्यांचे कामे प्राधान्याने सोडविणार असून,मला भेटण्यासाठी चिठ्ठी पध्दत नसून कायम स्वरुपी कार्यालयात भेटता येईल तसेच मी सतत सर्वासामान्यांच्या कामात व्यस्त राहणार असल्याचेही तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी सांगीतले.