सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण

41

शेती मध्ये दहा किलो धान्य पेरले की ते सहा महिन्यात शंभर किंटल धान्य देते,एक ज्वारीचा दाणा शेतजमिनी मध्ये पेरला तर त्यांचा एक धाडा वर येतो,त्याला एक कणीस लागले तर एका कणसात पाचशे ते हजार कमी जास्त ज्वारीचे दाणे असतात.असे दहा हजार कणीस एकत्र केले तर धान्यांची रास लागते. शेतजमीन,धान्य आणि मजूर हे तिघेही तन,मन,धनाने एकत्र आले तर लाखो लोकांना अन्नधान्य पुरवू शकतात.फक्त त्याला निसर्गाने साथ दिली पाहिजे.हा शेतकरी शेतमजूर देशाचा प्रेरणादायी व्यक्तिमत्व अन्नदाता म्हणून त्याला गौरवल्या गेले पाहिजे.एक वेळ अशी होती की भारत हा कृषिप्रधान देश होता,मेरे देश की धरती सोना उगले,उगले हिरा मोती असे गीत गायिल्या जात होते.आता त्या शेती व शेतकऱ्यांची फारशी दाखल घेतल्या जात नाही.शेतजमीन लाखो रुपयाची असते.पण त्यांना शेत जमीन दरवर्षी कसावी लागते.तरच ते दरवर्षी उत्पन्न देते.तिथे शिक्षणाला कोणतीही किंमत नसते.परंतु अनुभवला खूप महत्व असते.

निसर्ग नियमाचे सर्व अंदाज घेऊन नेहमीच निर्णय घेत असतात.कधी कधी ते चुकतात.शेतकरी व शेतमजूर हा मरे पर्यंत तोच असतो.त्याला फक्त अन्नदाता म्हटल्या जाते.पण मानसन्मान प्रतिष्ठा दिली जात नाही.ज्या प्रमाणे डॉक्टर,प्राध्यापक,वकिल, अभियंता,शिक्षक,सरकारी अधिकारी यांना दिली जाते. प्रत्येकाने शिक्षण घेतले असते ते ही वेगवेगळे असते.ते एकदाच सादर केले की वर्षाला दहा लाख,ते वीस लाख रुपये मिळतात.शेतकऱ्याकडे लाखो, करोडोंची शेती सातबाऱ्यावर असतांना ही किंमत नसते.मात्र राजकीय नेते शेतकरी असले कि दरवर्षी करोडो रुपयाचे उत्पन्न घेतात आणि दर पाच वर्षांनी त्याची संपती चार पटणे वाढली असते.ते असे कोणत पिक शेतात घेतात कि त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढते.

आणखी एक गोष्ट जी आम्हाला कधीच समजली नाही. की हे चित्रपट अभिनेते किंवा अभिनेत्री काय करतात की त्यांना प्रत्येक चित्रपटासाठी 50 कोटी किंवा 100 कोटी मिळतात?.एकच वेळ कॅमेऱ्यासमोर अभिनय करतात त्यात शंभर टक्के खोटारडेपणा असतो.तरी बहुसंख्ये लोक त्यांच्यातून प्रेरणा घेतात. प्रचार प्रसार माध्यमातून त्यांचा बाबत हात व तोंड दुखे पर्यंत लिहतात आणि बोलतात.ज्या देशात अव्वल शास्त्रज्ञ,डॉक्टर,अभियंता,प्राध्यापक,अधिकारी इत्यादींना वर्षाला 10 लाख ते 20 लाख रुपये मिळतात, त्याचं देशात एक चित्रपट अभिनेता दरवर्षी 10 कोटी ते 100 कोटी रुपये कमावतो. शेवटी तो काय करतो.आणि देशाला काय देतो?. देशाच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे?. शेवटी, तो असे काय करतो की तो फक्त एका वर्षात एवढा कमावतो की देशाच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाला ते कमवायला 100 वर्षे लागू शकतात!

आज देशाच्या नवीन पिढीला आकर्षित करणारे हे तीन क्षेत्र म्हणजे सिनेमा,क्रिकेट आणि राजकारण.या तीन क्षेत्रांशी संबंधित लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे.ही तीन क्षेत्रे आधुनिक तरुणांचे आदर्श आहेत, या क्षेत्राने तरुणांना शॉट कट पैसा कमविण्यासाठी सिनेमात अभिनेता बनण्याचे स्वप्न दाखविले,तर क्रिकेट ने लाखो करोडो लोकांना तरुणांना कामधंदा सोडून क्रिकेट खेळणे किंवा क्रिकेट सामने पाहण्याची सवय लावली.शोकांतिका ही आहे कि क्रिकेट मधील पराभवाने संपूर्ण देश दुखी होतो. परंतु जेव्हा कृषिप्रधान भारत देशाचा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्या व दलाल व्यापाऱ्या कडून लुटल्या जातो.तो उपाशी राहून आत्महत्या करतो तेव्हा इंडियातील कोणालाच त्यांचे छोटेशे सुद्धा दुख होत नाही. बी सी सी आय यांचा ब्राम्हण क्रिकेट क्लब हरतो कारण त्यांनी निवडलेल्या ११ पैकी ९ खिलाडी ब्राम्हण असतात.तरी त्यांना कोणी दोषी ठरवून त्यांची घरदारे हल्ला बोल करून जाळत नाहीत.क्रिकेटमुळे करोडो लोकांचे मनुष्यबळ कामधंद्यावर लक्ष न देता क्रिकेटवर लक्षवेधुन असतात. त्यामुळे किती नुकसान झाले तरी इंडियावाले लिहित नाही.किंवा चर्चा सत्र घेत नाही.मात्र भारतातील शेतकऱ्यांना काही सवलती जाहीर केल्या तर किती इंडियातील अर्थतज्ञ पुढे येवून चर्चा सत्र घडवून आणतात.

तिसरे राजकारण हा महाभयंकर रोग आहे,बेरोजगार तरुणांना वेळोवेळी जन आंदोलन करून तोडफोड करायला लावायचे एकवेळ पोलीस डायरी बनली की त्यांना जामीन घेऊन सोडून आणले की तो साहेबांचा खास झालाच म्हणजे समजा, मग दररोज बियरबार,चिकन,मटण बिर्याणी मोफत मिळालीच पाहिजे,आमदार,खासदार साहेबांचा माणूस हीच ओळख होते. या सिनेमा,क्रिकेट आणि राजकारण यांच्या विश्वासार्हतेवर कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह असतात. त्यामुळे ते देश आणि समाजासाठी निरुपयोगी असले तरी वृत्तवाहिन्या प्रिंट मिडिया त्यांना कायम प्रसिद्धी देतात.याबाबत कोणीच इंडिया वाले गांभियाने विचार करीत नाही.उलट भारतातील ग्रामीण भागात त्याबाबत स्पर्धा घेतल्या जातात.बॉलीवूडमध्ये ड्रग्ज, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग, आणि राजकारणातील गुंडगिरी,भ्रष्टाचार. या सगळ्यासाठी पैसा हे मुख्य कारण आहे आणि आपणच त्यांच्यासाठी हा पैसा आणतो. स्वतःचे पैसे जाळून आपण आपलेच नुकसान करत आहोत.ही मूर्खपणाची उंची आहे.

एककाळ होता कि प्रसिद्ध कलाकारांना सामान्य पगार मिळत असे.आणि क्रिकेटपटूंची कमाईही विशेष नव्हती.आताच्या राजकारणात इतकी लूट पहिला कधीच नव्हती.सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या माफियांच्या तावडीत अडकून आपण आपल्या तरुण मुलांचे आणि देशाचे भविष्य नष्ट करत आहोत.तरुण पिढी वाया जात आहे यांचे दुख भारतातून इंडियात आलेल्यानी केले पाहिजे.भारतातील लोकांनी इंडियातील लोकांचा कोणताही आदर्श घेऊ नये.त्यासाठी हे उदाहरण वाचा.एकदा व्हिएतनामी राष्ट्रपती हो-ची-मिन्ह भारतात आले, भारतीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी विचारले-“तुम्ही लोक काय करता?” हे लोक म्हणाले – “आम्ही राजकारण करतो.” त्याला हे उत्तर समजू शकले नाही, म्हणून त्याने पुन्हा विचारले – “म्हणजे, तुझा पेशा काय आहे?” हे लोक म्हणाले – “राजकारण हा आमचा व्यवसाय आहे.” हो -चि मिन्ह थोडे चिडले आणि म्हणाले – “कदाचित तुम्ही लोकांना माझा अर्थ समजत नाही. मी राजकारण पण करतो, पण व्यवसायाने मी एक शेतकरी आहे आणि मी शेती करतो. शेती माझी उपजीविका करते. सकाळी आणि संध्याकाळी मी जातो माझ्या शेतात. मी काम करतो. दिवसभरात राष्ट्रपती म्हणून मी देशासाठी माझी जबाबदारी पार पाडतो.” भारतीय शिष्टमंडळ अनुत्तरित गेले.त्याच्याकडे उत्तर नव्हते.

जेव्हा हो-ची-मिन्हने पुन्हा तीच गोष्ट विचारली, तेव्हा शिष्टमंडळाच्या एका सदस्याने मान हलवली आणि म्हणाले-“राजकारण हा आमचा व्यवसाय आहे.” हे स्पष्ट आहे की भारतीय नेत्यांकडे याचे उत्तर नव्हते. नंतर एका सर्वेक्षणातून असे दिसून आले की भारतातील सहा लाखांहून अधिक लोकांच्या उपजीविकेला राजकारणाचा आधार आहे. आज ही संख्या कोटींमध्ये पोहोचली आहे. आणि ते ही सर्व पक्षीय आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणत होते.माझा ठाम विश्वास आहे की ज्या देशात तरुण विध्यार्थीतुन आदर्श वैज्ञानिक,संशोधक, शिक्षणतज्ज्ञ तयार होत नसतील, पण अभिनेते,राजकारणी आणि खेळाडू तयार होत असतील, त्यांची स्वतःची आर्थिक प्रगती होईल, पण देश कधीही प्रगती करणार नाही. सामाजिक, बौद्धिक,सांस्कृतिक,सामाजिक दुष्ट्या देश नेहमीच मागास राहील. अशा देशाची एकता आणि अखंडता नेहमीच धोक्यात येईल.ज्या देशात अनावश्यक आणि अप्रासंगिक क्षेत्राचे वर्चस्व वाढत आहे, तो देश दिवसेंदिवस कमकुवत होत जाईल. देशात भ्रष्ट आणि देशद्रोही लोकांची संख्या वाढतच जाईल. प्रामाणिक लोक उपेक्षित राहतील आणि राष्ट्रवाद्यांना कठीण जीवन जगण्यास भाग पाडले जाईल.सर्व क्षेत्रात काही चांगले लोक आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व माझ्यासाठी नेहमीच सन्मानाचे असेल.आपण प्रतिभावान,प्रामाणिक,कर्तव्यनिष्ठ,समाजसेवक,देशभक्त,राष्ट्रवादी,वीर लोकांना आपले आदर्श बनवण्याची गरज आहे.

आपल्याकडे नृत्य-गायक,मादक पदार्थ, लंपट,गुंड,नेपोट्स-वर्णद्वेषी आणि दुष्ट देशद्रोह्यांना अपमानित करण्याची प्रवृत्ती विकसित करावी लागेल आणि सामाजिक,आर्थिक आणि राजकीय बहिष्कार टाकावा लागेल.आपल्या देशाच्या विकासात या लोकांचे योगदान काय आहे हे तुम्हीच ठरवा.जर आपण हे करू शकलो तर ठीक आहे, अन्यथा देशाचे पतन देखील निश्चित आहे. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणी जबाबदार नसतील तर आपण भारतीय नागरिक जबाबदार असणार.आम्ही नांव गांव नंबर देऊन सत्य परिस्थितीचे विश्लेषण करून लिहण्याचा प्रयत्न करतो.परंतु अनेक लोक आहेत ते चांगले विचार करून अभ्यासपूर्ण लिहतात पण नांव गांव नंबर टाकायला घाबरतात.मी अनेकांचे संदर्भ घेऊन लिहतो.कारण बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे ज्या गोष्टी पटत नाही त्या गोष्टीला विरोध करायला शिका.कारण इतिहास विरोध करणाऱ्यांचा लिहला जातो.तळवे चाटणारयांचा नाही.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,अध्यक्ष-सत्यशोधक कामगार संघटना (संलग्न- स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)मो:-९९२०४०३८५९