✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.6ऑक्टोबर):-पेठ मार्गावरील  कोटंबी घाटात सकाळी १० वाजेदरम्यान एसटी बस व गुजरातकडून नाशिककडे जाणारा ट्रक यांची समोरासमोर धडक  झाली.
सुमारे ५० प्रवाशी व २५ शालेय विद्यार्थी एसटी बसमधून प्रवास करत होते. या बसला  भरधाव ट्रकने  धडक दिल्याने ट्रक पलटी झाला. मात्र सुदैवाने किरकोळ अपवाद वगळता प्रवाशांना कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.

याबाबतचे वृत्त असे की, पेठ आगाराची एमएच १४ बीटी ३६०३ या क्रमांकाची बस नाशिक-पेठ बस घाट वळणावर चढत असताना नाशिककडे जाणाऱ्या आरजे २७ जीसी १४२२ क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन एसटीस ड्रायव्हरच्या बाजूने जोरदार धडक दिली.

यामुळे ट्रक रस्त्यालगतच पलटी झाला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने पेठ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED