धरणगांव येथे कृषी विभागामार्फत अनुदानावर बियाणे वाटप…

22

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.26ऑक्टोबर):-येथील शहा ऍग्रो याठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर हरभरा, रब्बी ज्वारी बियाणे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते वितरित करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी विधानसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, पी. एम. पाटील सर, राजेंद्र महाजन, किशोर शहा,तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी, तंत्र अधिकारी राजेंद्र लोहार, बिटीएम आत्मा दीपक नागपुरे, किरण वायसे, गजानन मोरे, विजय पाटील, ईश्वर पाटील तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.