तळेगाव वाशीयांनी आर.एन.कन्ट्रक्शन विरुद्ध दिला अमरण उपोषणाचा इशारा

64

🔸हदगाव तहसीलदार यांना शेकडो गावकऱ्यांनी दिले निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-823995466

नांदेड(दि.26ऑक्टोबर):-हदगाव तालुक्यातील तळेगाव येथे लागून असलेले क्रेशर डांबर प्लांट आहे.क्रेशर मालक रमेश नंदनी पाटणी आहे गट क्रमांक 76 असून आर.एन. कन्ट्रक्शन व डांबर प्लांटमुळे वायु प्रदूषण व ध्वनि प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांची क्रेशर व डांबर प्लांट हे बुद्धवाड्याला लागून आहे. त्यांच्या सर्वात जास्त त्रास होत आह. तसेच विद्यार्थ्यांना पण अभ्यास करण्यास त्रास होत आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई होत आहे कारण ब्लास्टीग मुळे बोर बंद पडतात आणि विहीर डगरत आहे तसेच रात्रभर चालू असल्यामुळे रात्रभर झोप येत नाही.

मातीच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुस्कान होत आहे. त्यांच्या वाहनांमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जागोजागी खड्डे पडत आहेत असे निवेदन तळेगाव येथिल शेकडो नागरिकांच्या सह्यानिशी तहसीलदार साहेबांना देण्यात आले.यावेळी निवेदनकर्ते राष्ट्रदिप वाढवे, शामराव भालेराव, करण वाढवे, विठ्ठल राऊत, प्रेम वाढवे, विजय काळे असे शेकडो गांवकरी उपस्थीत होते.