गेवराई तहसीलदारांचे पथक पहाटेच गोदामात्रात वाळु माफियांविरोधात मोठी कारवाई; सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त

27

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.26ऑक्टोबर):-तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदापत्रात पहाटे 5 च्या दरम्यान तहसीलदार सचिन खाडे यांनी आपल्या पथकासह छापा टाकून या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवासह एकूण सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदापात्रातून रात्रीच्या वेळी केन्याच्या साह्याने अवैध वाळू उपसा करत हायवामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज दि.26 रोजी पहाटे तहसीलदार सचिन खाडे यांनी आपल्या पथकासह गोदापत्रात विविध ठिकाणी छापे टाकले.
यामध्ये राक्षसभुवन येथे अवैध वाळू वाहतूक करणार्‍या पाच हायवा आढळून आल्यानंतर ते ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गेवराई तहसील कार्यालयात आणण्यात आले.

या कारवाईत एकूण एक कोटी पंचवीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. या कारवाईने अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले असून यांच्या काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

या कारवाईत तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह मंडळाधिकारी पखाले, तलाठी देशमुख,ठाकूर, वाटोरे, अक्षय डोपे, राठोड, किरण दांडगे, अमित तरवरे, निखिल तपसे, गोविंद नरोटे यांच्यासह आदींचा सहभाग होता.