रासेयो द्वारा कोविड-१९ लसीकरण शिबिर संपन्न

29

✒️पिंपळखुटा प्रतिनिधी(स्वाती इंगळे)

पिंपळखुटा(दि.26ऑक्टोबर):-श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा च्या राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र अंजनसिंगी यांचे संयुक्त विद्यमाने covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटन श्रीसंत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत सेलोकर यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष मुरे होते.

लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र अंजनसिंगीचे पी.डी बुंधांडे,विकी गायकवाड ,योगिता चव्हाण शुभांगी मात्रे सह टिमने केले तर शिबिराकरिता गावातील अंगणवाडी सेविका सूर्यकांता धांडे सिंधू जंजाळ सुरेखा गाढवे आशा वर्कर कमल राघोर्ते जयश्री बेदुरकार शालिनी हारगोडे शालिनी कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी ,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक-स्वयंसेविका तसेच गावातील/परिसरातील नागरिकांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घेतला.

प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेश इंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. मेघा सावरकर यांनी केले कार्यक्रमाकरिता प्रा.विजय कामडी,प्रा.सुषमा थोटे संतोष नागपुरे पद्माकर नागपुरे अमित मेश्राम ओमप्रकाश इंगोले यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.