आ. देवेंद्र भुयार यांच्याहस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मोरचुंद ते वडाळा रस्त्याचे भूमिपूजन !

34

🔸मोरचुंद ते वडाळा येथील रस्त्याचे दर्जोन्नती करण्यासाठी 1 कोटी 81 लक्ष 66 रुपये निधी मंजूर !

✒️मोर्शी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मोरचुंद(दि.26ऑक्टोबर):- वडाळा रस्ता बांधकामाचे भूमिपूजन मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचे हस्ते पार पडले. मोरचुंद वडाळा रस्ता बांधकामासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी 1 कोटी 81 लक्ष 66 हजार रुपयाचा निधी मंजूर करून दिला. मोर्शी मतदारसंघामध्ये विविध योजने अंतर्गत मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध होत असून या विकासकामांमूळे चेहरा मोहरा पलटणार असल्याचे विचार यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले.वरुड तालुक्यातील मोरचुंद ते ग्राम वडाळा येथील रस्त्याचे दर्जोनतिकरन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 1 कोटी 81 लक्ष 66 हजार रुपये निधीची तरतुद करुन दिल्यामुळे दिनांक 25 आक्टोबर रोजी आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ व जलदगतीने होण्यासाठी
रस्तेविकास हा अत्यंत महत्वाचा घटक असुन शासनाने रस्ते
विकासावर भर देऊन ग्रामीण भागाच्या विकासामध्ये रस्त्याची फार मोठी मोलाची भूमिका असुन दळणवळण अधिक सुलभ व जलदगतीने होण्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळु कोहळे पाटील, माजी सभापती राजाभाऊ कुकडे,
ऋषिकेश राऊत, सरपंच सौ.सुलोचनाताई मानकर, उपसरपंच गजाननराव शेळके, ग्राम पंचायत सदस्य छबूताई कोरडे, पंडित पाचपोर, प्रफुल निंभोरकर, मंदाताई कुकडे, छायाताई वाघ, सरपंच रत्नप्रभाताई चौधरी, सुभाष शेळके, हर्षल गलबले, नितीन भडांगे, महेश निकम, पंढरी साबळे, कृष्णा खंडार, गणेश चौधरी, राजु राऊत, प्रकाश कोहळे, उमेश देशमुख, श्याम ठाकरे, नंदकिशोर भडांगे, लक्ष्मणराव ठाकरे, सौरभ वाघ, अंकित वाघ,प्रविण कोरडे, होमराज चराटे, प्रविण शेळके, गजानन उपरकर, भुषण भोयर, वसंतराव भेंडे, निलेश लायबरे, पवन ठाकरे, राजेश साबळे, राजु वरुडकर तसेच ग्राम वडाळा, मोरचुंद, पवणी, चिंचरगव्हाण, फत्तेपूर येथील नागरिक उपस्थित होते .