चांदवड येथील नेमीनाथ जैन संचलित इंग्लिश मिडीयम स्कुल चार धक्कदायक अजब. ..गजब प्रकार उघडकीस, नागरिकांचा संताप

24

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.26ऑक्टोबर):-चांदवड येथील नेमीनाथ जैन ब्रम्हाचर्याश्रम संचलित श्री एस एन जे बी इंग्लिश मिडीयम स्कूल चा आज भलताच अजब गजब धक्कादायक घटना जागरूक नागरिक यांनी उघडकीस आणली आहे शाळेची फी न भरल्या मुळे ९ वी ते १० वी च्या विध्यार्थ्यां ची साहामाही परिक्षा चालू असतांना वर्गात अर्धे पेपर लिहून झाल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रातुन उठून दिले व स्वता उपप्राचार्य वैद्य सर यांनी त्यांना दुसऱ्या वर्गात 3 तास बसून डांबून ठेवले याबाबत मुलांच्या पालकांना कुठली ही माहिती दिली नाही गेली दोन वर्षे देशात कोरोना सारख्या महामारीने लोकांना रोजगार नाही उपास मारीची वेळ आली अशात च आताच कुठे लॉकडाऊन उघडला आणि रोजाराजी उदारनिर्वाह करून पोट भरत आहे.

अशातच श्री एस एन जे बी इंग्लिश मेडियम ने पालकांकडून गेल्या वर्षी ची फि पालकांना विश्वासात घेऊन भरून घेतली ,आता शाळा सुरू होऊन आठ दिवस झाले फि वसुली साठी वैद्य सर यांनी वेगळा भलताच प्रताप केला चक्क मुलं परीक्षेसाठीआले तर फी नाही भरली म्हणून विद्यार्थ्यांना शेजारच्या वर्गात डांबून ठेवले पालकांनी प्रहार संघटना चांदवड तालुका अध्यक्ष श्री सोमनाथ जाधव याच्यां कडे तक्रार केली प्रहार संघटना च्या वतीने गटविकास शिक्षण अधिकारी यांच्या कडे पालकांना घेऊन गेलो तिथे त्या प्राचार्या यांना बोलावले.

स्वता उपप्राचार्य वैद्य सर यांनी याची गटशिक्षणाधिकारी पंचायत यांच्या समोर कबुली दिली की आम्ही पालकांनी फि न भरल्यामुळे आम्ही मुलांना परीक्षा पासून दूर ठेवल शासन एक बाजुला सांगत की शिक्षण हा मूलभूत हक्क आहे शिक्षणा पासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही इथे तर शिक्षक च भक्षक झाले आहेत म्हणजे असा कुठल्याही कायदा नाही की मुलांना शिक्षणा पासून दूर ठेवणे हि शाळा फी वसुली साठी मुलांचा बळी देत आहेत शाळेत ९०० मुले आहेत नऊशे पैकी १४ मुलांनी फी भरली नाही म्हणून मुलांना ऐवडी मोठी शिक्षा दिली गेली ह्या शाळेवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी.

अन्यथा प्रहारच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्यात येईल प्रहार संघटना चांदवड तालुका यांच्यावतीने गटविकास शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहेतसेंच यांची सर्वं शिक्षण राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू , शिक्षण मञी वर्षा गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांना देऊन शाळेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष सोमनाथ जाधव प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना जिल्हा उपअध्यक्ष गणेश निंबाळकर प्रहार तालुका प्रमुख राम बोरशे पालक गौरव ठाकरे, शांताराम घुले प्रकाशशेळके ,सतीश शिंदे पत्रकार धनंजय पाटील आदी उपस्थित होते