✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.२६ऑक्टोबर):-गोवा बनावटीची दारू कर्नाटक पासिंगच्या आयशर टेम्पोच्या टपाला चोरकप्पे बनवून महाराष्ट्रात आणण्यात येत हाेती. २१ लाखाची गोवा बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने पकडली. गडहिंग्लज तालुक्यातील जांभळी रोडवर ही कारवाई करण्यात आली. आयशर टेम्पोसह ३१ लाख ४० हजार दाेनशे चा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागचे पोलिस अधिक्षक रविंद्र आवळे यांनी दिली . विदेशी कंपन्यांच्या नावाने असणारी गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बर्गे यांना मिळाली होती.

त्यांनी गडहिंग्लज मधील जांभळी रस्त्यावर सापळा लावला होता. रस्त्यालगत एका आयशर टेम्पो मधून दारूचे बॉक्स उतरण्यात येत असल्याचे पथकाला दिसले त्यांनी छापा टाकताच चार संशयित पळून गेले.आयशर टेम्पो मध्ये छताला लागून काही चोर कप्पे बनवण्यात आले होते. यामध्ये दारूचे तब्बल ३०० बॉक्स लपवून महाराष्ट्रात आणण्यात येत होते. गडहिंग्लज मधून दारू सर्वञ पुरविण्याचे संशयितांचे नियोजन राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने उधळून लावले.

गोवा बनावटीची दारू कर्नाटकाच्या टेम्पोतून महाराष्ट्रात आणण्याचा हा सर्व प्रकार पाहता हा आंतरराज्य टोळीकडून होणाऱ्या तस्करीचा प्रकार असल्याचाही उत्पादन शुल्क विभागाचा अंदाज आहे.संशयित आरोपी निखिल उर्फ बल्ल्या दत्ता रेडेकर, मारुती इराप्पा पाटील,भरमु यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या दृष्टीने पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी बर्गे यांनी सांगितले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रवींद्र आवळे,उपअधीक्षक दादासाहेब दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, संजय मोहिते, जवान संदीप जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, राजू कोळी, जय शिनगारे, मारुती पोवार यांनी केली.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED