धुळ्याच्या चिन्मयी ला महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत बालगटात प्रथम पारीतोषिक

32

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.27ऑक्टोबर):- दि.24/10/2021रोजी हाँटेल कलासागर पुणे येथे अहिराणी कस्तूरी मंच पुणे आयोजित महाराष्ट्र सौंदर्य या राज्यस्तरीय स्पर्धेत धुळे येथील वीरांगना झलकारी बाई कोळी महीला मंडळाच्या श्रीमती ज्योतीताई सुर्यवंशी यांची नात खान्देश कन्या “कु.चिन्मयी “धुळे हिने बालगटातून राज्यस्तरीय महाराष्ट्र सौंदर्य साम्राज्ञी बालगट मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला चांदीची ढाल व मानाचा मुकुट पटकवला… त्याबद्दल कु.चीन्मयी चे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.