✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.27ऑक्टोबर):-मध्ये बस आगार प्रमुखाला, 15 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळच्या दरम्यान शहरातील एका हाँटेलमध्ये केली आहे. श्रीनिवास वागदरीकर असे लाच घेणाऱ्या आगार प्रमुखाचे नाव आहे. गेवराई येथील आगार व्यवस्थापक श्रीनिवास वागदरीकर यांनी आगारातील भांडारपाल यांच्याकडे तुझा स्टोअरचा रिपोर्ट करणार नाही, म्हणून 30 हजार रुपयाची लाच मागीतली होती.

यानंतर तडजोडी अंती 15 हजार देण्याचे ठरले. दरम्यान याबाबत तक्रारदार यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वागदरीकर यांची तक्रार केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडून पडताळणी केली असता वागदरीकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सायंकाळच्या दरम्यान शहरातील हाँटेलमध्ये, सापळा रचून वागदरीकर यांना 15 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED