शेतक-यांच्या चेह-यावर आंतरिक आनंदाचं तेज

27

🔹प्रथमत: हा चमत्कार

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.27ऑक्टोबर):-दरवर्षी कापसांचं उत्पन्न भरपूर असायचं, पण योग्य असा भाव मिळायचा नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी व्यक्त व्हायची. कसं असतं कोणत्याही वस्तूचं जेव्हा उत्पादन वाढतं, तेव्हा त्याचा भाव पडताच असतो आणि उत्पादन घटतं तेव्हा त्याचा भाव वाढता असतो. या पडत्या भावामुळेच यावर्षी जिकडे-तिकडे बरेच शेतकरी सोयाबीनकडे वळले. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचं उत्पन्न वाढलं व कापसाचं घटलं. उत्पादनाच्या या वाढीव-घटीव नियमानुसार सोयाबीनचा भाव पडला नि कापसाचा वाढला. या दोन्ही पिकांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली होती. त्यामुळे दोन्ही पिकांचं ब-याच प्रमाणात नुकसान झालं. असं असलं तरीही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या उक्तीप्रमाणे जे हातात आलं त्यावर समाधान मानणे स्वाभाविक आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून सावरून शेतकरी हा जे उरलं त्यावर लक्ष केंद्रित करू लागला. ब-याच प्रमाणात सोयाबीनची काढणी व विक्री झाली. परंतु मनाजोगा भाव न मिळाल्याने शेतकरी हा दु:खावल्या गेला. बरेच शेतकरी सोयाबीनकडे वळल्यामुळे यावर्षी कापसाचं उत्पन्न खूप कमी आहे. ज्या शेतक-यांनी कापसाची लागवड केली, त्यांच्या शेतात नैसर्गिक आपत्तीमुळे बोंडांची संख्या जेमतेम असली तरी शेतक-यांमध्ये एक आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. त्याचं कारण असं की, आज रोजी कापसाला खूप छान भाव मिळत आहे. आज काही बाजार समिती अंतर्गत कापसाचा भाव 8000 रु.प्रति क्विंटलपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंदाचं तेच झळकत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हा कापसाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्याची निगा राखताना दिसून येत आहे.

सध्या बोंडांची संख्या कमी असली तरी ती कशी वाढवता येईल याकडे सक्ष केंद्रित करत आहे. अति पावसामुळे ब-याच पिकांचे नुकसान झाले असले तरी त्यातून सावरून, त्यावर मात करून ते नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नात प्रत्येक शेतकरी दिसत आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रथमत: आपला शेतकरी एवढ्या आनंदात दिसून येत आहे. हा आनंद शासनाने शेवटपर्यंत कायम राखावा. त्यांच्या या आनंदाला कसल्याचं प्रकारचं विरजन घालू नये एवढीच आशा..!