✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.27ऑक्टोबर):-प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक ध्येय डोळ्या समोर निश्चित करा आणि त्या धैय्याच्या दिशेने जाण्यासाठी वाटचाल करत रहा यशासाठी आतोणात प्रयत्न करा संकटे भरपुर येतील भिती हि दाखवली जाईल यशा पासुन दुर नेहण्यासाठी हे क्षेत्र सोडून द्यावे असे वाटेल पण असे करु नका तुमचे एक यश सर्व अपयशांना पुरुण उरेल या साठी जे जे या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करते आहेत त्यांनी धिर सोडू नये प्रयत्न महत्वाचा आहे कोणती हि आडचण आसुद्या त्यावर मार्ग निघत आसतो असे मत एमपीएसी मध्ये पशुधन विकास अधिकारी या परिक्षेत शुभांगी वाघमारे सिने मिळवलेल्या यशा बद्दल तिचा सत्कारा म्हसवड येथील जयभिम मंडळा तर्फे घेण्यात आला त्या प्रसंगी व्यक्त केले.

म्हसवड येथील जयभीम युवक मंडळाच्या वतीने कुकूडवाड ता माण येथील शुभांगी आदिनाथ वाघमारे या भिमकन्येने एमपीएससी मध्ये यश मिळवून पशुधन विकास अधिकारी वर्ग १ या पदाला गवसणी घालून या भिमकन्येने माण तालुक्यात इतिहास घडवला त्या भिमकन्येचा व तीचे गुरु आईवडिल व गुरु तुपे गुरुजी यांचा संयुक्त सत्कार म्हसवड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे जयभिम युवक तर्फे घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनि बाजीराव ढेकळे, प्रमुख पाहुणे सिध्दनाथ हाय. व ज्युनि. कालेजचे प्राचार्य प्रविण दासरे, या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती डॉ शुभांगी आदिनाथ वाघमारे, बामसेफचे तालुकाध्यक्ष तोरणे गुरुजी , विजय शिंदे, राजाराम तोरणे ,शिक्षक संघाचे सरचिटणीस तोरणे, आई सौ सत्यभामा वाघमारे, वडिल अदिनाथ वाघमारे कुमार सरतापे,अंगुली बनसोडे, एल के सरतापे, तुपे गुरुजी, सुशिला त्रिगुणे आदी उपस्थित होते.

यावेळी सपोनि बाजीराव ढेकळे म्हणाले ” जिवन किती सुंदर आहे, अनुभव तुम्हाला सांगत जाईल, प्रयत्न कराय विसरु नका मार्ग तुम्हाला सापडत राहिल” जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो आज कुकूडवाड या ग्रामीण भागातील दरर्या खोरर्यातील मुलीने अपार मेहनत घेऊन एमपीसीला गवसणी घालून आपल्या जिवनात टर्निंग पॅईन्ड मिळवला तसा प्रत्येकाच्या जिवनात एक टर्निंग पॅईन्ड मिळत असतो तसी मेहणतीने व कष्टातुन संधी निर्माण प्रत्येक मुलामुलीनी तयार करण्याचे आवहान म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि बाजीराव ढेकळे यांनी केले
यावेळी प्राचार्य प्रविण दासरे म्हणाले मिळालेल्या संधीचा वापर कसा करायचा ज्याचे त्याने ठरवायचे आहे आज अभ्यास करताना तुम्हाालाा ईन्टरनेट अॅनराॅड मोबाइल,सह सर्व प्रकारची पुस्तके घर बसल्या मिळतात आठ, नऊ वर्षापुर्वी हे काही नसतााना डॉ शुभांगी हिने धैर्यान व चिकाटीने ग्रामीण भागात राहुन मिळवलेले यश है कौतुकास्पद आहे डॉ शुभांंंग हिचा आदर्श समाज्यातील तरुणांनी घेण्याचे आवाहन प्राचार्य प्रविण दासरे यांनी केले.

यावेऴी कैलास तोरणे म्हणाले मोक्याच्या जागा मिळवण्याचे सतत स्वप्न बघा व ते सत्यात उतरविण्यासाठी जसे शिवाजीराजे यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते खरे केले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा पगड जाती जमातींना ,कामगारांना, महिलांना राज्यघटनेच्या माध्यमातून त्याचे मुलभुत हक्क व अधिकार देण्यासाठी पावाच्या तुकड्यावर भुक भागवून सन्मान दिला तसा सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येकांने जिद्द व चिकाटी ठेवली पाहिजे हे यश मिळवण्यासाठी आई वडिलांची भुमिका महत्त्वाची आहे आपलं मुल कसं घडवायचं हे आईने ठरवायचं आहे शिवाजीराजेना जिजाऊने घडवलं , बाबासाहेबांच्या पुस्तकासाठी रामजीबाबानी आपल्या विवाहीत मुलीचे दागीने गहान ठेवून बाबासाहेबांना पुस्तके विकत आणुन दिली.तेव्हा कुठे शिवाजीराजे, बाबासाहेब घडले शिवाजीराजे यांनी देश बदलला, बाबासाहेबांनी देश घडवला तसा मला फक्त माझे घर सुधारायचे आहे हे प्रत्येकांने ठरवून वाटचाल केली तरच घरापासून समाज सुधारेल वाघमारे दम्पत्यांनी हेच एक ध्येय ठेवून मुलीला शिक्षण दिले तसेच प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या पाल्याला घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे कैलास तोरणे यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रस्तावना व सुत्रसंचलन करताना राजकुमार तोरणे यांनी आपल्या सदाबहार शैलीतुन पालकांनी आपल्या पाल्य कसा घडवायचा हे शेर शायरीतुन सांगीतले.आभार व्यक्त करताना कु किर्ती सरतापे हिने आपल्याला समाज्याची शिक्षणाबाबतची खंत व्यक्त करून आत्ता मुलांनीच स्पर्धेत उतरण्यासाठी आपल्या पालकाकडे उच्चशिक्षणासाठी हट्ट करावा असे आभारात सांगीतले.यावेळी सर्व समाज बांधवासह महिला विद्यार्थी मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED